तीन नवीन काेराेनाबाधित, तर ६२ क्रियाशील रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:37 AM2021-01-25T04:37:50+5:302021-01-25T04:37:50+5:30

गडचिराेली : जिल्ह्यात रविवारी तीन काेराेनाबाधित आढळून आले. तर १४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. ...

Three new caries patients, 62 active patients | तीन नवीन काेराेनाबाधित, तर ६२ क्रियाशील रूग्ण

तीन नवीन काेराेनाबाधित, तर ६२ क्रियाशील रूग्ण

Next

गडचिराेली : जिल्ह्यात रविवारी तीन काेराेनाबाधित आढळून आले. तर १४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता केवळ ६२ रूग्ण क्रियाशील असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत बाधित ९३१५ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ९१४८ वर पोहचली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण १०५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२१ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.६७ टक्के तर मृत्यू दर १.१३ टक्के आहे.

नवीन ३ बाधितांमध्ये गडचिरोली १, मुलचेरा १ व वडसा येथील एका जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या १४ रूग्णांमध्ये गडचिरोली ३, भामरागड १, चामोर्शी २, मुलचेरा २, सिरोंचा २, कुरखेडा ३ व वडसा मधील एका जणाचा समावेश आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील कन्नमवाननगर १, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये विवेकानंदपुर १ व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये हनुमान वार्डातील एका जणाचा समावेश आहे.

Web Title: Three new caries patients, 62 active patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.