थकबाकीदार १७९ ग्राहकांची बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:07 AM2019-08-11T00:07:02+5:302019-08-11T00:07:30+5:30

महावितरणने वीज बिल वसुलीची मोहीम १ आॅगस्टपासून धडाक्यात सुरू केली आहे. मागील आठ दिवसात सहा तालुक्यातील १७९ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वीज बिलाची पूर्ण वसुली होईपर्यंत ही मोहीम चालूच राहणार आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Thumbs up to 90 outstanding customers | थकबाकीदार १७९ ग्राहकांची बत्ती गुल

थकबाकीदार १७९ ग्राहकांची बत्ती गुल

Next
ठळक मुद्देमहावितरणची १ आॅगस्टपासून मोहीम । १ कोटी २० लाख रुपये अजुनही थकीत

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महावितरणने वीज बिल वसुलीची मोहीम १ आॅगस्टपासून धडाक्यात सुरू केली आहे. मागील आठ दिवसात सहा तालुक्यातील १७९ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वीज बिलाची पूर्ण वसुली होईपर्यंत ही मोहीम चालूच राहणार आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
थकीत वीज बिलामुळे महावितरणच्या अडचणीत वाढ होते. त्यामुळे वीजेचा पुरवठा करण्याबरोबरच वीज बिल वसुलीकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश वरिष्ठ कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत. त्यामुळे वीज बिल वसुलीकडे गडचिरोली जिल्ह्यातील महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष पुरविले आहे. गडचिरोली विभागांतर्गत गडचिरोली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची या सहा तालुक्यांचा समावेश होतो. १ एप्रिल नंतर ज्या ग्राहकांकडे आजपर्यंत वीज बिल थकीत आहे, अशा ग्राहकांची संख्या २ हजार ८२४ एवढी होती. त्यांच्याकडे १ कोटी ८४ लाख ४२ हजार रुपयांची थकबाकी होती. वेळोवेळी नोटीस बजावूनही संबंधित ग्राहक वीज बिलाचा भरणा करीत नसल्याने महावितरणतर्फे वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम १ आॅगस्टपासून हाती घेतली. मोहीम हाती घेताच ६०७ ग्राहकांनी ३७ लाख १४ हजार रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. काही ग्राहकांनी मात्र महावितरणच्या मोहिमेला प्रतिसाद दिला नाही. अशा १७९ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. अजुनही २ हजार ग्राहकांकडे १ कोटी २० लाख रुपये थकीत आहेत.

महावितरणने वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर काही ग्राहकांनी बिल भरण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी व शनिवारी सुटी असतानाही दोन दिवसात ग्राहकांनी ४० लाख रुपये वीज बिलाचा भरणा केला आहे.

वीज पुरवठा खंडीत झाल्यास संबंधित कुटुंबाप्रती समाजात वेगळा संदेश जातो. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने वीज बिलाचा भरणा वेळेत करावा व कारवाई टाळावी. वीज बिल वसुली मोहीम आॅगस्टच्या महिनाभर राबविली जाणार आहे.
- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण गडचिरोली

Web Title: Thumbs up to 90 outstanding customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.