पासेस असतानाही विद्यार्थ्यांकडून काढली तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:35 AM2021-04-10T04:35:40+5:302021-04-10T04:35:40+5:30
गडचिरोलीवरून अहेरीकडे गुरुवारी सकाळी बसफेरी निघाली. या बसमध्ये हा प्रकार घडला. यावर्षी मानव मिशनअंतर्गत मुलींना मोफत पास एप्रिलपर्यंत देण्यात ...
गडचिरोलीवरून अहेरीकडे गुरुवारी सकाळी बसफेरी निघाली. या बसमध्ये हा प्रकार घडला. यावर्षी मानव मिशनअंतर्गत मुलींना मोफत पास एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे. आष्टी येथे परिसरातील अनेक गावांतील ३०० विद्यार्थी बस ने ये-जा करतात. ७ एप्रिलपासून ५ ते ९ व ११वीचे वर्ग बंद करण्यात आले. दहावी व बारावीचे वर्ग भरत नसले तरी या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा व अन्य कामे शाळेत सुरू आहेत. त्यामुळे दहावी व बारावीच्या मुलींना मोफत पास योजनेचा परीक्षेपर्यंत लाभ मिळणार आहे. असे असतानाही बसवाहकाने विद्यार्थ्यांकडून तिकीटचे पैसे घेतले. तिकीट काढणाऱ्या वाहकावर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
कोट
मानव विकास मिशनच्या बसेस विद्यार्थ्यांसाठी आहेत. आम्हाला शाळेकडून किंवा शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना नाही. त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पास असल्यास बसमध्ये तिकीटशिवाय येऊ देणे आवश्यक आहे. आगारातर्फे वाहकाला कुठल्याही सूचना आम्ही दिलेल्या नाही.
वाय. एम. राठोड, आगार व्यवस्थापक, अहेरी आगार