काळ आला होता, पण वेळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:23 AM2018-12-24T00:23:58+5:302018-12-24T00:24:24+5:30

समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटून चक्क एका सार्वजनिक विहिरीत घुसली. पण नशिब बलवत्तर म्हणून कार विहिरीत पडण्यापासून थोडक्यात बचावली.

The time had come, but there was no time | काळ आला होता, पण वेळ नाही

काळ आला होता, पण वेळ नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटून चक्क एका सार्वजनिक विहिरीत घुसली. पण नशिब बलवत्तर म्हणून कार विहिरीत पडण्यापासून थोडक्यात बचावली. यामुळे कारमधील तीन जणांना नवजीवन मिळाले. ‘काळ आला होता, पण वेळ नाही’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय देणारी ही घटना येथून जवळच असलेल्या कोंढाळानजिक रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, येथील माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांचे कनिष्ठ बंधू नंदलाल अर्जुनदास मोटवानी (५५) आणि राजकुमार अर्जुनदास मोटवानी (५१) यांच्यासह चालक भास्कर टेंभुर्णे (३५) हे एमएच ३३, ए ५६३५ या कारने शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास गडचिरोलीवरून वडसाकडे येत होते. कोंढाळाजवळ समोरून एक दुचाकीचालक भरधाव येत असल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने कार रस्त्याच्या कडेला वळविली. मात्र कारने एक पलटी खाऊन ती कार जवळच असलेल्या विहिरीला जाऊन धडकली. या धडकेत विहिरीचे संरक्षक कठडे तुटून कारचे दोन्ही चाक विहिरीत घुसले.
गावच्या पोलीस पाटील किरण कुंभलवार यांच्यासह गावकºयांनी रात्रीच मदतीला धाऊन येत कारमधील मोटवानी बंधंूना सुरक्षितपणे बाहेर काढले. यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला.

Web Title: The time had come, but there was no time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात