सात कोटींचे धान चुकारे थकीत

By admin | Published: February 14, 2016 01:18 AM2016-02-14T01:18:41+5:302016-02-14T01:18:41+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने आधारभूत खरेदी ..

Tired seven crores of rice powdered | सात कोटींचे धान चुकारे थकीत

सात कोटींचे धान चुकारे थकीत

Next

शेतकरी मेटाकुटीस : महामंडळामार्फत २ लाख ३१ हजार क्विंटल धान खरेदी
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने आधारभूत खरेदी व एकाधिकार खरेदी योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात एकूण ५८ केंद्रांवरून आतापर्यंत एकूण २ लाख ३१ हजार ७१४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. आधारभूत खरेदी योजनेंतर्गत ७ कोटी ९ लाख ११ हजार ६३५ व एकाधिकार खरेदी योजनेंतर्गत ३६ लाख ६ हजार ८४८ असे एकूण ७ कोटी ४५ लाख १८ हजार रूपयांचे शेतकऱ्यांचे धान चुकारे थकीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत आधारभूत खरेदी योजनेत एकूण ३९ व अहेरी कार्यालयांतर्गत १९ अशा एकूण ५८ धान खरेदी केंद्रांवरून आतार्यंत २ लाख २३ हजार ४०९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या धानाची एकूण किंमत ३१ कोटी ५० लाख ८ हजार २९ रूपये आहे. यापैकी महामंडळाने शेतकऱ्यांना १४ कोटी ७७ लाख ३३ हजार ५३९ रूपयांचे धान चुकारे अदा केले आहेत. अद्यापही आधारभूत खरेदी योजनेंतर्गत ७ कोटी ९ लाख ११ हजार ६३५ रूपयांचे धान चुकारे थकीत आहेत.
एकाधिकार खरेदी योजनेंतर्गत गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत संस्थांचे व कार्यालयोच मिळून एकूण ५५ केंद्रांवरून १ कोटी ६९ लाख ४४ हजार ४२४ रूपये किमतीच्या ८ हजार ३०४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी १ कोटी २७ लाख ११ हजार ८१२ रूपयांचे धान चुकारे अदा करण्यात आले आहेत. अद्यापही एकाधिकार खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे ३६ लाख ६ हजार ८४८ रूपयांचे धान चुकारे थकीत आहेत.
महामंडळामार्फत कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या कुरखेडा, कढोली, नान्ही, गोठणगाव, गेवर्धा, आंधळी, सिरपूर, सोनसरी, मौशी, खरकाडा या १० धान खरेदी केंद्रांवरून आतापर्यंत एकूण ६ कोटी ११ लाख ३ हजार ९३० रूपये किमतीच्या ४३ हजार ३५५ क्विंटल धानाची खरेदी झाली. कोरची उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत सहकारी संस्थांच्या कोरची, मसेली, बेतकाठी, रामगड, मालेवाडा, येंगलखेडा, खेडेगाव, पुराडा, बेडगाव, बोरी, मर्केकसा या ११ केंद्रांवर आतापर्यंत ५ कोटी ५१ लाख ८२ हजार ४९३ रूपये किमतीच्या एकूण ३९ हजार १३६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.
आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत सहकारी संस्थांच्या अंगारा, उराडी, कुरंडीमाल, देलनवाडी, दवंडी, पिंपळगाव, चांदाळा, पोटेगाव, मौशीखांब या नऊ धान खरेदी केंद्रावरून आतापर्यंत ४ कोटी ५ ५ लाख २ हजार ६७ रूपये किमतीच्या ३२ हजार २७० क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या सहकारी संस्थांच्या धानोरा, रांगी, मुरूमगाव, कारवाफा, सुरसुंडी, गट्टा या सहा केंद्रांवरून आतापर्यंत ३ कोटी ४७ लाख १४ हजार ३९७ रूपये किमतीच्या एकूण २४ हजार ६२० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)

नगदी चुकाऱ्यामुळे व्यापाऱ्यांकडे ओढा
आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान विक्रीचे पैसे संबंधित शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात मिळत नाही. संस्थांनी हुंड्या वटविल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात धान चुकाऱ्याची रक्कम अदा करण्यात येते. याला विलंब होतो. मात्र खासगी व्यापारी नगदीमध्ये धान खरेदी करून शेतकऱ्यांना तत्काळ धान विक्रीची रक्कम अदा करतो. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी पडत्या भावात नगदी रक्कमेच्या हव्याशा पोटी व गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री केली.

एकाधिकार योजनेतून दीड कोटींची धान खरेदी
महामंडळाच्या एकाधिकार खरेदी योजनेंतर्गत २०१५-१६ च्या खरीप हंगामात सहकारी संस्था व प्रादेशिक कार्यालयाच्या एकूण ५५ केंद्रावरून आतापर्यंत १ कोटी ६३ लाख १८ हजार ६६० रूपये किमतीच्या ८ हजार ३०४ क्विंटलची धान खरेदी झाली आहे. यामध्ये कुरखेडा उपप्रादेशि कार्यालयांतर्गत ९ लाख ४४ हजार ७७५ रूपये किमतीच्या ४६५ क्विंटलची धान खरेदी झाली आहे. कोरची उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ३ लाख ५९ हजार रूपये तर आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ३६ लाख ८६ हजार ३१७ रूपयांची खरेदी झाली आहे. धानोरा उपप्रादेशि कार्यालयांतर्गत ४९ लाख ५३ हजार ९४३ रूपये किमतीच्या धानाची खरेदी करण्यात आली आहे.

Web Title: Tired seven crores of rice powdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.