मिष्ठान्नाच्या दुकानाआड तंबाखू विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:00 AM2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:54+5:30

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देसाईगंज शहरातील अवैध व्यावसायिकांनी कमी वेळात दामदुप्पट रक्कम मिळण्याची हमी असलेल्या सुगंधित तंबाखू विक्रीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात मिष्ठान्न भांडार व प्रोव्हीजन्सच्या नावाखाली नाममात्र दुकान टाकून या दुकानाच्या आड सुगंधित तंबाखू विक्रीचा व्यवसाय केला जात आहे. यातून व्यावसायिक अल्पावधीत मोठी कमाई करीत आहेत.

Tobacco sales around the confectionery shop | मिष्ठान्नाच्या दुकानाआड तंबाखू विक्री

मिष्ठान्नाच्या दुकानाआड तंबाखू विक्री

Next
ठळक मुद्देदेसाईगंज बनले मुख्य केंद्र : रात्रीच्या सुमारास चालतो गोरखधंदा

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : नाममात्र मिष्ठान्न विक्रीचे दुकान टाकून या दुकानाच्या आड बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू विक्रीचा गोरखधंदा देसाईगंज शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सुगंधित तंबाखू विक्रीचे देसाईगंज हे मुख्य केंद्र बनले असताना अन्न प्रशासन विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देसाईगंज शहरातील अवैध व्यावसायिकांनी कमी वेळात दामदुप्पट रक्कम मिळण्याची हमी असलेल्या सुगंधित तंबाखू विक्रीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात मिष्ठान्न भांडार व प्रोव्हीजन्सच्या नावाखाली नाममात्र दुकान टाकून या दुकानाच्या आड सुगंधित तंबाखू विक्रीचा व्यवसाय केला जात आहे. यातून व्यावसायिक अल्पावधीत मोठी कमाई करीत आहेत.
पूर्व विदर्भात देसाईगंज शहर भौगोलिकदृष्ट्या अगदी मध्यभागी असून येथून भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ई-पास घेऊन सुगंधित तंबाखूची आयात केली जाते.
१६ एप्रिल रोजी देसाईगंज शहरात धाड टाकून तंबाखू विकणाऱ्या व्यावसायिकांविरूद्ध कारवाई करण्यात आली होती. तहसील कार्यालय, नगर परिषद पथक व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात खर्रा पन्नी, सुगंधित तंबाखू, गुटख्याच्या पुड्या व जर्दा तंबाखूचे पुडे जप्त करण्यात आले होते.
मात्र जप्त केलेल्या त्या सुगंधित तंबाखूची परस्पर विल्हेवाट लावल्याची चर्चा सुरू आहे. व्यावसायिकांवर कायदेशिर कारवाई झालेलीच नसल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

देसाईगंज शहरातून जप्त केलेला सुगंधित तंबाखू आमच्या कार्यालयाकडे जमा करण्यात आलेला नाही. परस्पर विल्हेवाट लावण्यात आली असल्यास संबंधितांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
- प्रवीण उमप, अन्न निरीक्षक, सहायक आयुक्त कार्यालय, गडचिरोली
 

Web Title: Tobacco sales around the confectionery shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.