आज होणार साईनामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 08:47 PM2018-01-29T20:47:06+5:302018-01-29T20:48:29+5:30

श्री. साई समाधी शताब्दी महोत्सव समिती, श्री. साई भक्त परिवार गडचिरोली तसेच श्री. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्याने ३० जानेवारी रोजी मंगळवारला साईबाबा संस्थान शिर्डी येथून श्री. साईबाबांच्या जीवन चरणपादुका (मूळ) गडचिरोली शहरात दर्शनाकरिता येत आहे.

Today's alarming alarm | आज होणार साईनामाचा गजर

आज होणार साईनामाचा गजर

Next
ठळक मुद्देउत्सव समितीतर्फे जय्यत तयारी : साईबाबांच्या चर्मपादुकांचे ढोलताशांच्या गजरात होणार आगमन

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : श्री. साई समाधी शताब्दी महोत्सव समिती, श्री. साई भक्त परिवार गडचिरोली तसेच श्री. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्याने ३० जानेवारी रोजी मंगळवारला साईबाबा संस्थान शिर्डी येथून श्री. साईबाबांच्या जीवन चरणपादुका (मूळ) गडचिरोली शहरात दर्शनाकरिता येत आहे.
त्यानिमित्त सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चरणपादुका येथील चामोर्शी मार्गावरील साई मंदिरात भाविकांसाठी दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे. याशिवाय भजन संध्या, मध्यान्ह आरती, महाप्रसाद, रक्तदान शिबिर, निम वृक्ष वाटप आदी कार्यक्रम होणार असून सायंकाळी ‘सबका मालिक एक’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सव समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. भाविकांसाठी समितीतर्फे साईबाबांच्या चर्म पादुकांच्या दर्शनार्थ दर्शन रांग तयार करण्यात आली आहे. शिर्डी येथे साईबाबांची समाधी असलेली प्रतिकृती तयार करण्यात आलेली असून शिर्डी गडचिरोली शहरात अवतरणार आहे.
अशी आहे वाहन पार्र्किं ग व्यवस्था
आरमोरी मार्गावरील वाहनांसाठी शिवानी पेट्रोल पंपच्या मागील पटांगण, पोस्ट आॅफिस जवळील पोपट बिल्डिंग यांचे भव्य पटांगण, चामोर्शी मार्गावरून येणाºया वाहनांसाठी जि. प. हायस्कूलचे पटांगण, धानोरा मार्गावरील वाहनांसाठी माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांच्या घरासमोर पटांगण, चंद्रपूर मार्गाने येणाºया वाहनांसाठी चंद्रपूर रोडवरील अभिनव लॉन येथील पटांगण तसेच चामोर्शी मार्गावरील वाहनांसाठी कावळे यांचे पटांगण टॅक्सी पार्इंट चामोर्शी रोड, पोटेगाव बायपास रोडवरील लॉन येथे वाहन पार्र्किं गची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच गडचिरोली शहरात येणारी वाहतूक सेमाना बायपास रोड कॉम्प्लेक्स मार्गे इंदिरा गांधी चौक येथून इतरत्र वळती करण्यात येणार आहे.

Web Title: Today's alarming alarm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.