शौचालय लाभार्थी तीन महिण्यांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:23 AM2021-07-05T04:23:29+5:302021-07-05T04:23:29+5:30
तालुक्यात गावे गोदरीमुक्त व्हावे म्हणून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाचा लाभ वंचित घटकाना देण्यात आला होता. कुंभीटोला येथील ...
तालुक्यात गावे गोदरीमुक्त व्हावे म्हणून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाचा लाभ वंचित घटकाना देण्यात आला होता. कुंभीटोला येथील ७ ते ८ लाभार्थाना तर तालुक्यात ५० पेक्षा अधिक लाभार्थाना शौचालय मंजूर करण्यात आले होते. यावेळी कुंभीटोला येथील लाभार्थ्यांना ग्रामसेवक जी. आर. बरडे यानी तुम्ही तातडीने शौचालयाचे बांधकाम करा अन्यथा तुमचा निधी परत जाईल, अशी तंबी दिली जात होती. त्यामुळे येथील लाभार्थानी दुकानदाराकडून उसनेवारी करीत साहित्य खरेदी केले व शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. मात्र बांधकाम पूर्ण झाल्याला तीन महिण्याचा कालावधी उलटूनही शौचालय अनुदानाची रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्यात न आल्याने लाभार्थी त्रस्त आहेत दुकानदार उसने पैशांचा वसुलीकरिता तगादा लावत असल्याने लाभार्थांची मानसिकता खालावली असून त्यानी तीन दिवसात अनुदानाची रक्कम न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात संवर्ग विकास अधिकारी अनिता तेलंग यांना विचारणा केली असता सदर योजनेची रक्कम संबंधित ग्रामपंचायतच्या खात्यात टाकण्यात आलेली असून ग्रामपंचायतकडून लवकरच ती लाभार्थांच्या खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती दिली.