सौरऊर्जेवरील नळ योजना पडली बंद
By admin | Published: September 30, 2016 01:33 AM2016-09-30T01:33:25+5:302016-09-30T01:33:25+5:30
आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल येथील सौरऊर्जेवरील लघु नळ योजना बंद पडल्याने या योजनेवर झालेला लाखो रूपयांचा
लाखोंचा खर्च पाण्यात : चामोर्शी माल येथील स्थिती
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल येथील सौरऊर्जेवरील लघु नळ योजना बंद पडल्याने या योजनेवर झालेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे व नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
चामोर्शी माल येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत सन २०११ मध्ये सौरऊर्जेवरील दुहेरी लघु नळ योजना तयार करण्यात आली. सदर योजनेवर ५ लाख ३३ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याचे स्त्रोत कमी असल्याने नेहमीच पाणीटंचाईच्या गावात शासनाने सौरऊर्जेवरील लघु नळ योजना कार्यान्वित केल्या. या योजनेत वॉटर टँक व हातपंपावरील मोटारपंप, सौरऊर्जा यंत्र बसविले. मात्र मोटारपंपाचा पाईप वॉटर टँकशी जोडण्यात आला नाही. त्यामुळे लघु नळ योजनेला पाणीच आले नाही व या योजनेचा नागरिकांना उपयोग झाला नाही. लघु नळ योजना शोभेची वस्तू ठरली आहे. यावर झालेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. या नळ योजनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)