ऊसासाठी लावलेल्या वीज तारांचा स्पर्श; अकरावीतील मुलाचा मृत्यू

By गेापाल लाजुरकर | Published: September 18, 2024 06:57 PM2024-09-18T18:57:35+5:302024-09-18T18:58:13+5:30

देसाईगंज तालुक्यातील घटना : पीक संरक्षणासाठी साेडला हाेता करंट

Touching of power lines laid for sugarcane; Death of a boy in class eleven | ऊसासाठी लावलेल्या वीज तारांचा स्पर्श; अकरावीतील मुलाचा मृत्यू

Touching of power lines laid for sugarcane; Death of a boy in class eleven

गडचिराेली : ऊसाच्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी झटका मशीनचा वापर न करता थेट जिवंत विद्युत प्रवाह साेडलेला हाेता. याच तारांना स्पर्श झाल्याने अकरावीत शिकणाऱ्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना साेमवार, १६ सप्टेंबर राेजी दुपारी ३:४५ वाजेच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या बाेळधा येथे घडली.

आकाश दुर्वास गायकवाड (१७) रा. महागाव, जिल्हा. गाेंदिया, असे मृत मुलाचे नाव आहे. देसाईगंज तालुक्यातील बोळधा येथे शेतकरी दुर्वास गायकवाड यांची शेती आहे. त्यांच्या शेतात धान पीक लावलेले आहे. आकाश गायकवाड हा गोंदिया जिल्ह्यातील महागाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी शिकत हाेता. १६ सप्टेंबरला शाळेला सुट्टी असल्याने तो घरीच होता. त्यामुळे शेतातील धानाला पाणी देण्यासाठी आकाश व त्याचा चुलतभाऊ दोघेही बाेळधा येथील शेतात आले हाेते. आकाश हा आपल्या शेताला पाणी करून घराकडे परतत असताना गुणाजी मन्साराम गायकवाड या शेतकऱ्याच्या शिवधुऱ्यावरून येत हाेता. लगतच ऊसाची शेती असलेल्या याच धुऱ्यावर तारांच्या कंपाउंडमध्ये विद्युत प्रवाह साेडलेला हाेता. याच तारांना स्पर्श झाल्याने आकाशचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोका पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दरम्यान, पोलिसांनी गुणाजी मन्साराम गायकवाड व मुलगा उमाजी गुणाजी गायकवाड या पितापुत्राला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आकाश हा आईवडिलांना एकुलता मुुलगा हाेता. त्याच्या पश्चात आई-वडील व मोठी बहीण आहे.

अशी घडली घटना
विद्युत प्रवाह साेडलेल्या जिवंत विद्युत तारेला आकाशचा स्पर्श झाल्याने ताे तडफडला व मानेच्या बाजूने तारांवर पडला. गळ्याच्या भाेवती तार गुंडाळल्याने तडफडून जागीच त्याचा मृत्यू झाला. प्रत्यक्ष घटना पाहून चुलत भावाची भंबेरी उडाली. त्याने घटनेबाबत कुटुंबीयांना कळविले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

Web Title: Touching of power lines laid for sugarcane; Death of a boy in class eleven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.