गडचिरोलीतील कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:57 AM2021-07-19T11:57:20+5:302021-07-19T11:57:56+5:30
Gadchiroli news सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. जंगल हिरवेगार झाले आहे. निसर्गरम्य वातावरण व शुद्ध हवा यांचा आस्वाद घेण्याकरिता शहरी भागातील अनेक पर्यटक हत्ती कॅम्पला येऊन आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: निसर्गरम्य वातावरण असलेल्या दुर्गम भागात सभोवताली डोंगराळ अशा आनंदमय वातावरणात हत्ती कॅम्प वसलेले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. जंगल हिरवेगार झाले आहे. निसर्गरम्य वातावरण व शुद्ध हवा यांचा आस्वाद घेण्याकरिता शहरी भागातील अनेक पर्यटक हत्ती कॅम्पला येऊन आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या कालावधीत हत्ती कॅम्पला भेट देणाऱ्यांची संख्या अतिशय कमी झाली होती. आता मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच लॉकडाऊनच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुुळे मागील दीड वर्षापासून घरी बसलेले पर्यटक आता बाहेर निघण्यास सुरुवात झाली आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्प हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. अहेरी परिसरात फिरायला येणाऱ्या प्रत्येकाचे पाय कमलापूरकडे वळल्याशिवाय राहत नाहीत. तसेच आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. कमलापूर येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करीत आहे.