सेंद्रिय शेतीचा अवलंब करून विषमुक्त अन्न पिकवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:24 AM2021-07-04T04:24:50+5:302021-07-04T04:24:50+5:30
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या अधीक्षक कृषी अधिकारी प्रज्ञा गोळघाटे, तहसीलदार सी.जी. पित्तुलवार, संवर्ग विकास अधिकारी ...
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या अधीक्षक कृषी अधिकारी प्रज्ञा गोळघाटे, तहसीलदार सी.जी. पित्तुलवार, संवर्ग विकास अधिकारी एम.ई. कोमलवार, नायब तहसीलदार दामोदर भगत, उपसभापती विलास गावडे, तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, मंडळ कृषी अधिकारी एल.एस. पाठक, प्रगतशील शेतकरी परसराम पदा, वामन सावसागडे उपस्थित होते. केवळ निर्वाहापुरती शेती न करता शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज आहे. शेतीपूरक व्यवसायावर भर देऊन आपल्या उत्पन्नात वाढ करून जीवनमान उंचवावे, असे आवाहनही काेरेटी यांनी केले. कृषी विभाग पंचायत समिती, आत्मा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेऊन कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता करण्यात आली. कृषी संजीवनी कार्यक्रमात २१ ते ३० जून या कालावधीत गावागावात जाऊन शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे यांनी मानले.