१०० ची नोट नसल्याने व्यापार थंडावला

By admin | Published: November 10, 2016 02:24 AM2016-11-10T02:24:43+5:302016-11-10T02:24:43+5:30

बुधवारच्या मध्यरात्रीपासून केंद्र सरकारने ५०० व १००० रूपयांच्या चलनी नोटा रद्द केल्याने याचा थेट परिणाम व्यापारावर पडल्याचे दिसून आले.

The trade is stifled due to lack of 100 | १०० ची नोट नसल्याने व्यापार थंडावला

१०० ची नोट नसल्याने व्यापार थंडावला

Next

पेट्रोलपंपावर दिवसभर होत्या रांगा : अनेक ठिकाणी १००० व ५०० ची नोट स्वीकारणार नसल्याचे फलक झळकले
गडचिरोली : बुधवारच्या मध्यरात्रीपासून केंद्र सरकारने ५०० व १००० रूपयांच्या चलनी नोटा रद्द केल्याने याचा थेट परिणाम व्यापारावर पडल्याचे दिसून आले. ५० व १०० च्या नोटा अनेकांकडे उपलब्ध नसल्याने याचा मोठा परिणाम व्यापार उलाढालीवर दिसून आला. बुधवार असल्याने गडचिरोली शहरातील बाजारपेठही बंदच होती. सकाळपासूनच पेट्रोल पंपावर १००० व ५०० च्या नोटा घेऊन हजेरी लावली व वाहनांमध्ये पेट्रोल भरले. किराणा दुकान व मॉलमध्ये ५०० व १००० च्या नोटा स्वीकारण्यात आल्या नाही. त्यामुळे छोट्या ग्राहकांना निराशाच पदरात पडली.

१०० च्या नोटा नसल्याने बाजारावर मोठा परिणाम
५०० व १००० रुपयाचा नोटा रद्द झाल्याने अहेरी येथील दैनंदिन व्यवसायावर याचा मोठा प्रभाव पडला. लोकांकडे १०० रुपयाचे सुटे नोट नसल्याने कापड, किराणा, भाजीपाला , जनरल दुकान तसेच दैनंदिन उपयोगात येणारे वस्तू खरेदीसाठी पैसे असूनही नागरिकांना काहीच उपयोग झाला नाही. अशीच परिस्थिती पेट्रोलपंपावरही होती. पेट्रोल पंप वर पेट्रोल भरताना लोकांना 100 च्या नोटा आणावे लागत आहे किंवा पूर्ण 500 रुपयाचा पेट्रोल भरून घ्यावा लागत होते.
बँकांना मेल उशिरा मिळाले
पोस्ट आॅफीस व बँकात पैसे बदलून मिळणार आहे, अशी सूचना देण्यात आली होती. मात्र १० नोव्हेंबरला बँक व पोस्ट बंद राहणार असल्याचा मेल अहेरीच्या बँकेला बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मिळालेला नव्हता.

Web Title: The trade is stifled due to lack of 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.