व्यापाऱ्यांचा अंदाज चुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:39 AM2021-08-23T04:39:32+5:302021-08-23T04:39:32+5:30
अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित दुकाने रविवारी बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार दर रविवारी गडचिराेली शहरातील बाजारपेठ बंद ...
अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित दुकाने रविवारी बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार दर रविवारी गडचिराेली शहरातील बाजारपेठ बंद ठेवली जात हाेती. मात्र २२ ऑगस्ट राेजी राखी पाैर्णिमेचा सण हाेता. शनिवारी शासकीय कर्मचाऱ्यांना सुटी हाेती. तसेच रविवारी बाजारपेठ बंद राहिल या उद्देशाने बहुतांश महिलांनी शनिवारीच खरेदी आटाेपली. शनिवारी माेठी गर्दी दिसून आल्याने रविवारीसुद्धा गर्दी कायम राहील असा अंदाज हाेता. मात्र हा अंदाज फाेल ठरला.
रविवारी सकाळपासूनच दुकाने उघडण्यात आली. मात्र फारसे ग्राहक दिसून येत नव्हते. ग्राहकांविना त्रस्त झालेल्या काही दुकानदारांनी सायंकाळी ५ वाजताच दुकाने बंद केली. गडचिराेली शहरातील बाजारपेठेत ग्रामीण भागातील जवळपास २५ टक्के नागरिकांची गर्दी राहते. मात्र रविवारी ग्रामीण भागातील जनता गडचिराेलीला आलीच नाही. दुकानात काम करणाऱ्या मजुरांना आठवड्याची सुटी द्यावी लागते. मात्र रविवारची सुटी रद्द झाल्याने आता त्यांना सलग १५ दिवस काम करावे लागणार आहे.