गोवारी बांधव जोपासत आहेत ढालपूजनाची परंपरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 05:14 PM2017-10-18T17:14:47+5:302017-10-18T17:18:52+5:30

The tradition of the Dhaalpujnan in Gowari | गोवारी बांधव जोपासत आहेत ढालपूजनाची परंपरा !

गोवारी बांधव जोपासत आहेत ढालपूजनाची परंपरा !

Next
ठळक मुद्देदिवाळीला अनेक गावात ढालपूजनपूर्वजांची स्मृती राखण्याचा उद्देश

विष्णू दुनेदार/अतुल बुराडे

्रगडचिरोली
ग्रामीण जीवनाच्या पटलावर असंख्य जाती-जमाती, त्यांच्या उपजाती आजही आपल्या पारंपरिक धंदा आणि प्रथा, परंपरा जोपासत सुखनैव जीवन जगत आहेत. त्यातलीच एक जमात आहे गोवारी. वर्षांनुवर्षांपासून वंशपरंपरागत गुरेढोरे राखणारी जमात म्हणजे गोवारी. मात्र आज या जमातीतील तरु णतरूणी काही प्रमाणात सुशिक्षित झाले असले तरी गोवारी जमात बांधवांनी ढालपूजन ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा वर्तमानात सुरू ठेवली आहे, हे विशेष !
महाराष्ट्र राज्याच्या पूर्व सीमेवर असलेल्या विदर्भ प्रदेशातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये गोवारी, गोंडगोवारी हा समाज वसलेला आहे. परंतु ग्रामीण भागातील गोवारी जमात ओळखली जाते दिवाळी सणाच्या पर्वावर केल्या जाणाºया ढालपूजन या आगळ््यावेगळ््या प्रथेसाठी.
गोवारी जमातीतील बांधव आपल्या पूर्वजांची स्मृती जपून त्यांचे पूजन करण्यासाठी आजही ढाल तयार करु न दिवाळीच्या दिवशी पूजन करतात. एका उंच बासावर लाकडी चौकट बसवून सजवतात तिला गोवारी ढाल म्हणतात. दिवाळीच्या दिवशी ती ढाल घरी उभी करतात व गायी गोदनाच्या वेळी वाजत गाजत आखरावर आणली जाते व या निमित्ताने गोवारी बांधव एकत्र येतात.
गायी गोदनला गोवारी बांधव खूप महत्त्व देतात. दिवाळीच्या दिवशी गोदन तयार करण्यासाठी घोणस गवत व गाईचा शेण याचा वापर करतात. गोदन तयार झाल्यानंतर गावातील बांधव आपआपल्या गार्इंना गोदनावरु न नेतात. त्या नंतर गोवारी बांधव ढालींची मिरवणूक काढतात.
ढालीचे दोन प्रकार असतात. एक नर ढाल म्हणजे पुरु षाच्या स्मृती जोपासणारी तिला गोहळा म्हणतात तर दुसरी मादी ढाल म्हणजे स्त्रीच्या स्मृती जोपासणारी तिला गोहळी म्हणतात. गोवारी बांधव गोहळा-गोहळी ढालीला पुरु ष व स्त्रीवाचक नाव सुध्दा देतात. गोवारी बांधव ढालीचे पूजन वर्षातून तीनदा, आखाडी, मातापूजन व दिवाळीला करीत असले तरी दिवाळीच्या ढाल पूजनाला विशेष महत्त्व देतात व मिरवणूक काढतात.
ढालीची सजावट आकर्षक असते. मोरिपसे, शेल्ली, फुल्ली, दुप्पटा व खण अशी साधने वापरु न सजवलेली ढाल वाजतगाजत गाय गोदनापर्यंत आणली जाते. गोवारी बांधव ढाल धरणाºया समोर जोशात नाचतात. नंतर गोदनाजवळ पारंपारिक लाठी फेरण्याचा कार्यक्र म होतो. यामध्ये कुडा या वनस्पतीच्या लाठीला गेरु लावून वापर करतात. हा कार्यक्र म उपस्थित लोकांचे लक्ष वेधून घेते. अशाप्रकाच्या ढाल पूजनाचा कार्यक्र म देसाईगंज तालुक्यातील तुळशी, कोकडी, विसोरा, शंकरपूर, चोप, कोरेगाव, बोळधा या ठिकाणचे गोवारी बांधव आजही मोठ्या उत्साहानं साजरा करतात.
 

Web Title: The tradition of the Dhaalpujnan in Gowari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :diwaliदिवाळी