राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:04 AM2019-04-01T00:04:33+5:302019-04-01T00:05:42+5:30
सिरोंचा तालुक्यातील बालमुत्यमपल्लीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरून चारचाकी व अवजड वाहनांचे आवागमन वाढल्याने दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील बालमुत्यमपल्लीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरून चारचाकी व अवजड वाहनांचे आवागमन वाढल्याने दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे या महामार्गाचे बांधकाम वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिरोंचा ते बालमुत्यमपल्ली पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गाने चारचाकी व अवजड वाहने आवागमन करीत असतात. तसेच नागरिकसुद्धा ये-जा करीत असतात. अंकिसा गावात अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाणे आहेत. येथे खरेदी-विक्रीसाठी नागरिकांची गर्दी असते. सदर मार्ग पुढे आसरअल्ली मार्गे सोमनूर संगमाकडे जात असल्याने येथून अधिकची गर्दी असते. असे असतानाही गावातून अवजड ट्रक व अन्य चार-सहा चाकी वाहने ने-आण केली जातात. गावातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आवागमन करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.