अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 11:57 PM2017-09-03T23:57:19+5:302017-09-03T23:59:37+5:30
येथील आंबेडकर चौकामध्ये असलेल्या बसस्थानकाजवळ खासगी प्रवासी वाहनांची नेहमीची गर्दी व व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळे बरेचदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : येथील आंबेडकर चौकामध्ये असलेल्या बसस्थानकाजवळ खासगी प्रवासी वाहनांची नेहमीची गर्दी व व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळे बरेचदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे.
आंबेडकर चौकात वाहनांची नेहमीच वर्दळ असते. अहेरी व चामोर्शी मार्गाने येथून वाहनांचे आवागमन दिवसभर सुरू असते. शिवाय चौकातील दुकानदारांचे अतिक्रमण रस्त्यावर आल्याने रस्त्यावर गर्दी असते. त्यातच बसस्थानक असल्याने अजुनच गर्दी असते . या ठिकाणी खासगी प्रवासी वाहने उभे राहत असल्याने एसटी महामंडळाच्या बसेस उभ्या करायला जागा राहत नाही. त्यामुळे या चौकामध्ये नेहमी वाहतुकीची कोंडी होते. दुचाकी वाहनधारकांना वाहन चालविने कठीण जाते. संपूर्ण चौक गर्दीने व्यापत असल्याने आवागमनास अडथळा निर्माण होतो. याचा त्रास मात्र सामान्य नागरिकांना होत आहे.
चंद्रपूर, आलापल्ली रोड, चामोर्शी या मार्गावर दुकानदारांनी सामान रस्त्याच्या जागेवर ठेवल्याने या मार्गानेसुद्धा वाहतुकीची कोंडी होते. बांधकाम विभाग व पोलीस विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष घालून वाहतुकीची समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.