नागपूर मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प
By admin | Published: July 12, 2016 02:16 AM2016-07-12T02:16:39+5:302016-07-12T02:16:39+5:30
नजीकच्या गाढवी नदीच्या पुलाजवळ रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड रोडवर पडल्याने गडचिरोली-नागपूर
वीज खांबासह तारा तुटून पडल्या : गाढवी नदीच्या पुलाजवळ झाड कोसळले
आरमोरी : नजीकच्या गाढवी नदीच्या पुलाजवळ रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड रोडवर पडल्याने गडचिरोली-नागपूर मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प पडली. सदर झाड जीवंत विद्युत तारावर पडल्याने विद्युत तारांसह दोन खांब तुटून पडल्याची घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
गुलमोहरचे मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आरमोरीचे वाहतूक पोलीस बंडू कोसरे, ठाकरे, मच्छीरकडे व कुंभारे यांनी घटनास्थळ गाठून ठाणेगाव येथील नागरिकांच्या मदतीने रस्त्यावरील झाड तोडून मार्ग मोकळा केला. तसेच वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडीत केला. या ठिकाणचे दुसरे गुलमोहरचे झाड झुकलेले असून ते कोसळण्याच्या मार्गावर आहे.