तिमरमवासियांची आवागमनाची समस्या सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:34 AM2021-03-06T04:34:47+5:302021-03-06T04:34:47+5:30
गुडीगुडम : अहेरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय तिमरमस्थित गुडीगुडमअंतर्गत येणाऱ्या तिमरममधील मुख्य रस्त्याची सिमेंट काँक्रीट कामास सुरुवात करण्यात ...
गुडीगुडम : अहेरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय तिमरमस्थित गुडीगुडमअंतर्गत येणाऱ्या तिमरममधील मुख्य रस्त्याची सिमेंट काँक्रीट कामास सुरुवात करण्यात आली आहे. काम हाती घेण्यात आले असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. तिमरमवासियांची आवागमनाची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. सदर रस्त्याचे काम ठक्करबाप्पा आदिवासी सुधार योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.
पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांना ये - जा करण्यास नाहक त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याच्या दुरुस्ती किंवा सिमेंट काँक्रीटीकरण करण्यास कित्येकदा मागणी केली होती. आता ती पूर्ण झाली आहे. यासाठी लोकमतनेसुद्धा प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला होता. त्यास आता यश आले आहे.
सदर रस्त्याचे काम अंगणवाडी केंद्रापासून ते खुशाल सिडाम यांच्या घरापर्यंत होणार आहे. सदर रस्त्याचे भूमिपूजन पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी सरपंच महेश मडावी, नरेंद्र सडमेक, राकेश सडमेक आदी गावकरी उपस्थित होते.