आरमाेरीतील माेकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:37 AM2021-08-15T04:37:42+5:302021-08-15T04:37:42+5:30
आरमाेरी शहरात मागील काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सदर जनावरे मुख्य मार्गावर मधोमध उभी व ...
आरमाेरी शहरात मागील काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सदर जनावरे मुख्य मार्गावर मधोमध उभी व बसून राहतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. रात्रीच्या सुमारास मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांचा अपघात होण्याची भीती असते. तसेच काही मोकाट जनावरे शहराला लागून असलेल्या शेतात जाऊन धान पिकाचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे सदर मोकाट जनावरांचा नगरपरिषद प्रशासनाने बंदोबस्त करावा व पशुपालकांना ताकीद द्यावी, अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे महासचिव सारंग जांभुळे, प्रीतम धोंडणे, उमेश इंदूरकर, हर्षल तिरंगाम, श्रावण डोंगरवार, साबीर शेख यांनी मुख्याधिकारी माधुरी सलामे यांच्याकडे निवेदनातून केली.
बाॅक्स
फवारणी करा
आरमाेरी शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धाेका असताना ताप आला तरी भीती निर्माण होते. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने तापाची साथ येऊन आरमोरीवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्वच भागात डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणीही युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
140821\img-20210812-wa0051.jpg
आरमोरी नगरपरिषदच्या मुख्याधिकारी माधुरी सलामे याना निवेदन देताना युवक कांग्रेसचे सारंग जांभूळे व प्रितम धोंडणे