काेराेनाकाळातही कत्तलीसाठी जनावरांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:33 AM2021-04-14T04:33:36+5:302021-04-14T04:33:36+5:30
शेतीत यंत्राचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे जनावरांची गरज कमी झाली आहे. तसेच गाय, म्हैस, बैल यासारखी जनावरे पाळल्यास ...
शेतीत यंत्राचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे जनावरांची गरज कमी झाली आहे. तसेच गाय, म्हैस, बैल यासारखी जनावरे पाळल्यास दिवसभर त्यांना चारायला न्यावे लागते. परिणामी इतर जाेड व्यवसाय करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे अनेक पशुपालकांनी जनावरे विकण्यास सुरुवात केली आहे. याचा गैरफायदा दलालांकडून घेतला जात आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली जनावरे कत्तलीसाठी नेली जातात. यासाठी मुख्य व्यापाऱ्याने गावात दलाल नेमले आहेत. हे दलाल जनावरांचा शाेध घेतात. तसेच जनावरांची वाहतूक करण्यासही मदत करतात. यासाठी त्यांना निश्चित कमिशन मिळते. त्यामुळेच एका वेळेवर ट्रकभर जनावरे नेली जातात. दरवर्षी जनावरांची विक्री हाेत असल्याने ग्रामीण भागातील पशुधन घटण्यास सुरुवात झाली आहे. दहा वर्षांपूर्वी असलेल्या पशुधनाच्या तुलनेत आता केवळ १० टक्के पशुधन शिल्लक आहे.