बेरोजगारांना बकरी पालनाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:41 AM2019-01-16T01:41:59+5:302019-01-16T01:42:52+5:30

बँक आॅफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ३२ प्रशिक्षणार्थ्यांना बकरी पालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. शेतीला जोड व्यवसाय म्हणून बकरी पालन हा अतिशय चांगला व्यवसाय आहे.

Training for goat rearing for unemployed | बेरोजगारांना बकरी पालनाचे प्रशिक्षण

बेरोजगारांना बकरी पालनाचे प्रशिक्षण

Next
ठळक मुद्देआरसेटीचा उपक्रम : ३२ बेरोजगारांना लाभ, जोड व्यवसाय उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बँक आॅफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ३२ प्रशिक्षणार्थ्यांना बकरी पालनाचे प्रशिक्षण देण्यात आले.
शेतीला जोड व्यवसाय म्हणून बकरी पालन हा अतिशय चांगला व्यवसाय आहे. गडचिरोली जिल्ह्यात झुडूपी जंगल मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बकरी पालनाच्या व्यवसायाला बराच वाव आहे. ही बाब लक्षात घेऊन आरसेटीच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाला गडचिरोली पंचायत समितीच्या सहायक गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे, बँक आॅफ इंडियाचे जिल्हा अग्रणी प्रबंधक प्रमोद भोसले, एरिया प्रबंधक विजयसिंह बैस, संस्थेचे संचालक एस. पी. टेकाम, सामाजिक कार्यकर्त्या कुसूम आलाम, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम, पी. डी. काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मरस्कोल्हे यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय वाढवावा. एखाद्या कार्यालयात सेवा देताना जेवढे काम करावे लागते, तेवढेच काम स्वत:च्या व्यवसायात केल्यास शासकीय नोकऱ्यापेक्षा अधिकचे उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, असे मार्गदर्शन केले. विजयसिंह बैस यांनी मार्गदर्शन करताना बँक सदैव उद्योजकांच्या पाठीशी राहिली, असा विश्वास व्यक्त केला. भोसले यांनी मार्गदर्शन करताना बँकेकडे कर्जाची मागणी केल्यास कर्ज पुरवठा केला जाईल, असे प्रतिपादन केले.
प्रशिक्षणादरम्यान जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. एस. वंजारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्गेश गोल्हेर, डॉ. अरविंद कसबे, डॉ. अमोल पडोळ, डॉ. श्रीकांत सावरकर, डॉ. भास्कर रामटेके, डॉ. सी. पी. लोंढे आदी उपस्थित होते. यावेळी राधेश्याम कासेटी, अरविंद गेडाम, नरेश कुकुडकर, तारका जांभुळकर या प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी प्रज्ञा शेंडे, विजय पत्रे यांनी सहकार्य केले.
 

Web Title: Training for goat rearing for unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.