तलाठ्यांना नवीन मॉड्युलचे प्रशिक्षण
By admin | Published: June 4, 2016 01:17 AM2016-06-04T01:17:10+5:302016-06-04T01:17:10+5:30
संगणकीकृत सातबारा व हस्तलिखित सातबारा यामध्ये कोणतीही तफावत आढळून येऊ नये, यासाठी नवीन मॉड्युल तयार करण्यात आल्या आहेत.
गडचिरोली : संगणकीकृत सातबारा व हस्तलिखित सातबारा यामध्ये कोणतीही तफावत आढळून येऊ नये, यासाठी नवीन मॉड्युल तयार करण्यात आल्या आहेत. या मॉड्युलच्या वापराविषयीचे प्रशिक्षण २ जून रोजी तलाठी व मंडळ अधिकारी यांना देण्यात आले आहे.
प्रशिक्षणाला निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने, उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, जिल्हा विज्ञान अधिकारी शिवशंकर टेंभूर्णे, तहसीलदार डी. एस. भोयर उपस्थित होते व मार्गदर्शन केले. संगणकीकृत सातबारा हा हस्तलिखीत सातबाराशी तंतोतंत जुळेल या उद्देशाने ई-फेरफार आज्ञावलीमध्ये एडीट मॉड्युल विकसित करण्यात आले आहे. सदर मॉड्युलच्या सहाय्याने संगणीकीकृत सातबारा हस्तलिखीत सातबारा यामध्ये कोणतीही तफावत आढळून येणार नाही. दोन्ही सातबारे तंतोतंत जुळविण्याचे काम ३० जून पर्यंत पूर्ण करण्याचे व ज्या सातबारांची जुळवणी झाली नसेल त्या गटक्रमांकाच्या उताऱ्याची मागणी असल्यास हस्तलिखीत सातबारा देण्यात यावा, असे आदेश दिले आहेत. (नगर प्रतिनिधी)