गडचिराेली जिल्ह्यातील चार एसडीपीओंच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 09:44 PM2023-05-23T21:44:52+5:302023-05-23T21:45:22+5:30

Gadchiroli News राज्य शासनाच्या गृहविभागाने पाेलिस दलातील पाेलिस उपअधीक्षक/सहायक पाेलिस आयुक्त नि:शस्त्र संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या २२ मे राेजी केल्या. यात गडचिराेली जिल्ह्यातील चार उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

Transfer of four SDPOs in Gadchireli district | गडचिराेली जिल्ह्यातील चार एसडीपीओंच्या बदल्या

गडचिराेली जिल्ह्यातील चार एसडीपीओंच्या बदल्या

googlenewsNext

गडचिराेली : राज्य शासनाच्या गृहविभागाने पाेलिस दलातील पाेलिस उपअधीक्षक/सहायक पाेलिस आयुक्त नि:शस्त्र संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या २२ मे राेजी केल्या. यात गडचिराेली जिल्ह्यातील चार उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यातून चार एसडीपीओ बदली हाेऊन गेले असले, तरी केवळ एका नवीन एसडीपीओची नियुक्ती गृहविभागाने केली आहे. धानाेरा, अहेरी व अनुसूचित जमाती पडताळणी समितीत नवीन अधिकाऱ्यांना पदस्थापना दिली नसल्याने, येथील पद सध्या तरी रिक्त राहील.


गडचिराेलीचे उपविभागीय पाेलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांची बदली सांगली जिल्ह्याच्या मिरज उपविभागीय पाेलिस अधिकारी पदावर केली. त्यांच्या जागी उपविभागीय पाेलिस अधिकारी म्हणून पुणे जिल्ह्याच्या पिंपरी- चिंचवडचे सहायक पाेलिस आयुक्त प्रशांत अमृतकर हे येणार आहेत. याशिवाय धानाेराचे उपविभागीय पाेलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांची बदली पुणे जिल्ह्याच्या दाैंड येथे, अहेरीचे उपविभागीय पाेलिस अधिकारी अमाेल ठाकूर यांची बदली सातारा जिल्ह्याच्या कराड येथे एसडीपीओ पदावर झाली. गडचिराेली येथील अनुसूचित जमाती पडताळणी समिती कार्यालयातील पाेलिस उपअधीक्षक संजीव नारकर यांची बदली बृहन्मुंबईचे सहायक पाेलिस आयुक्त या पदावर गृहविभागाने केली.

दाेन सहायक समादेशकांची बदली
सशस्त्र पाेलिस उपअधीक्षक/सहायक समादेशक, राज्य राखीव पाेलिस बल या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्याही २२ मे राेजी गृहविभागाने केल्या. गडचिराेली जिल्ह्यातून वडसा (देसाईगंज) येथील राज्य राखीव पाेलिस बलगट क्रमांक १३ चे सहायक समादेशक ईश्वर चाैधरी यांची बदली सहायक समादेशक राज्य राखीव बल गट क्र. २ पुणे येथे झाली, तर वडसा येथीलच सहायक समादेशक दशरथ जांभुळकर यांची बदली सहायक समादेशक राज्य राखीव पाेलिस बल गट क्रमांक-४ नागपूर येथे झाली, तर वडसा येथील गट क्रमांक १३ चे नवीन सहायक समादेशक म्हणून नागपूरच्या गट क्रमांक ४ चे सहायक समादेशक ललीत मिश्रा यांची पदस्थापना करण्यात आली.

Web Title: Transfer of four SDPOs in Gadchireli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस