नागुलवाडीत व्यसनी १६ रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:39 AM2021-09-18T04:39:20+5:302021-09-18T04:39:20+5:30
दारूचे व्यसन हे मानसिक आजार असून उपचाराने बरे होते, ही संकल्पना रुजवीत रुग्णांना दारूच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला ...
दारूचे व्यसन हे मानसिक आजार असून उपचाराने बरे होते, ही संकल्पना रुजवीत रुग्णांना दारूच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यासाठी गावागावात व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन केले जात आहे. नागुलवाडीत १६ रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
दरम्यान, मुक्तिपथ अभियानाचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी रुग्णांना दारूचे दुष्परिणाम सांगत माहिती घेतली. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींची माहिती देत पूजा येल्लुरकर यांनी रुग्णांचे समुपदेशन केले. क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक किशोर मलेवार यांनी केले. यशस्वितेसाठी सरपंच सविता दूर्वा, गाव पाटील, माधव गावडे, ग्रामसभा अध्यक्ष तोंदे हलामी यांच्यासह गाव संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले.