कांचनपूर व आलेंगात १९ व्यसनी रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:24 AM2021-07-09T04:24:09+5:302021-07-09T04:24:09+5:30

जिल्ह्यात व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यसनी रुग्णांना उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित केल्या जात आहे. रुग्णांना उपचार घेणे सोयीस्कर ठरावे यासाठी ...

Treatment of 19 addicted patients in Kanchanpur and Alenga | कांचनपूर व आलेंगात १९ व्यसनी रुग्णांवर उपचार

कांचनपूर व आलेंगात १९ व्यसनी रुग्णांवर उपचार

Next

जिल्ह्यात व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यसनी रुग्णांना उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित केल्या जात आहे. रुग्णांना उपचार घेणे सोयीस्कर ठरावे यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे बाराही तालुक्यात क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. तसेच गाव पातळीवरसुद्धा क्लिनिकचे आयोजन केले जाते. आजपर्यंत अनेक रुग्णांनी मोफत उपचार घेत दारूचे व्यसन सोडले आहे. कांचनपूर येथे नुकतेच क्लिनिकचे आयोजन करण्यात आले. यात ८ रुग्णांवर उपचार व औषधोपचार करण्यात आला तर आलेंगा येथे ११ रुग्णांनी उपचार घेतला. दोन्ही क्लिनिकच्या माध्यमातून १९ रुग्णांनी पूर्ण उपचार दारूमुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला. इतर व्यसनी रुग्णांनीसुद्धा उपचार घेऊन दारूमुक्त होण्याचे आवाहन करण्यात आले.

कांचनपूर येथे अरुण भोसले यांनी रुग्णांचे समुपदेशन केले तर छत्रपती घवघवे यांनी दारूचे दुष्परिणाम समजावून सांगत रुग्णांची माहिती घेतली. शिबिराचे नियोजन तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी केले तर यशस्वीतेसाठी गावातील पोलीस पाटील शंकरी बाेईन, सुक्रिता मंडल, तंमुस अध्यक्ष सुभाष सरकार, दयाल मंडल, डॉ.वरद यांनी सहकार्य केले. आलेंगा येथे साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांचे समुपदेशन केले. पूजा येलूरकर यांनी रुग्णांची माहिती घेतली. शिबिराचे नियोजन तालुका संघटक किशोर मलेवार यांनी केले. यशस्वीतेसाठी सरपंच सनकू पुंगाटी, गाव पाटील देवाजी नरोटे, विणुता नरोटे व पार्वती गोटा यांनी सहकार्य केले.

Web Title: Treatment of 19 addicted patients in Kanchanpur and Alenga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.