५५० लोकांची चिकित्सा

By admin | Published: October 6, 2016 02:19 AM2016-10-06T02:19:57+5:302016-10-06T02:19:57+5:30

अतिदुर्गम व छत्तीसगड सीमेलगतच्या दामरंचा येथे उपपोलीस ठाण्याच्या वतीने नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

Treatment of 550 people | ५५० लोकांची चिकित्सा

५५० लोकांची चिकित्सा

Next

नि:शुल्क आरोग्य तपासणी : पोलीस विभागाचा पुढाकार; औषधी वाटप
अहेरी : अतिदुर्गम व छत्तीसगड सीमेलगतच्या दामरंचा येथे उपपोलीस ठाण्याच्या वतीने नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या शिबिरात एकूण ५५० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीनंतर गरजूंना औषधीचे वाटप करण्यात आले.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले. या शिबिरात अहेरी येथील बालरोग व स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सलूजा, जनरल फिजिशियन डॉ. काकडे, डॉ. मामीलवाड यांनी रूग्णांवर नि:शुल्क उपचार करून त्यांना औषधींचे वाटप केले. या शिबिरात हिवताप, त्वचारोग, प्रसूतीपूर्व तपासणी, सिकलसेल, वातविकार आदी आजारांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरात चिटवेली, तोडेर, नैनगुडम, आशा नैनेर, मोदुमडगू, मांड्रा, कुरूमपल्ली, कोडसेपल्ली, बामनपल्ली, येचली, मन्नेराजाराम आदी गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली. यशस्वीतेसाठी उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोरे, पीएसआय वांगणेकर, लवटे, भोसले, पाटील व जवानांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
मच्छरदाणींचे वाटप
डासांमुळे विविध आजार उद्भवतात. दुर्गम भागातील नागरिकांना डासांपासून आजार होऊ नयेत. दुर्गम भागातील नागरिकांना सहाय्य व्हावे, याकरिता एका दानशूर व्यक्तीने नागरिकांना मोफत मच्छरदाणीचे वाटप केले. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते नागरिकांना मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले.

Web Title: Treatment of 550 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.