वृक्ष लागवड कार्यक्रमाचा जिल्ह्यात उडाला फज्जा
By admin | Published: July 7, 2016 01:25 AM2016-07-07T01:25:26+5:302016-07-07T01:25:26+5:30
यंदा राज्य शासनाच्या वतीने वनमहोत्सवाअंतर्गत राज्यभरात दोन कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
यंदा राज्य शासनाच्या वतीने वनमहोत्सवाअंतर्गत राज्यभरात दोन कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमाची गडचिरोली जिल्ह्यातही अंमलबजावणी करण्यात आली. १ जुलै रोजी जिल्ह्याच्या सर्व दूर भागात सात लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली; मात्र लावण्यात आलेल्या वृक्षांना पिंजरे बसविण्यात आले नाही. तसेच काटेरी कुंपणही करण्यात आले नाही. त्यामुळे लावण्यात आलेली अनेक झाडे दुसऱ्याच दिवशी मोकाट जनावरांनी फस्त केले. एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयाला ५० झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनाने वसाहत व रुग्णालय परिसरात वृक्षांची लागवड केली. आरोग्य कर्मचारी वसाहतीत लावण्यात आलेल्या झाडांना कुंपण करण्यात आले नाही. त्यामुळे त्याच दिवशी दुपारी मोकाट जनावरांनी लावलेली वृक्ष फस्त केली. त्यामुळे पाने विरहीत झाडे उरली आहे. कुंपणाअभावी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा जिल्ह्यात फज्जा उडाला आहे.