बाजारात पालेभाज्या गडगडल्या
By Admin | Published: December 26, 2016 01:32 AM2016-12-26T01:32:00+5:302016-12-26T01:32:00+5:30
जिल्ह्यात बाराही तालुक्यात भाजीपाला पिकाची लागवड केली जाते. सध्या हिवाळा सुरू असून
सर्वसामान्यांना दिलासा : ग्रामीण व दुर्गम भागातून आवक वाढली
गडचिरोली : जिल्ह्यात बाराही तालुक्यात भाजीपाला पिकाची लागवड केली जाते. सध्या हिवाळा सुरू असून पालेभाज्याचे पीक शेतात बहरले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातून शहरी बाजारात पालेभाज्याची आवक वाढल्यामुळे पालेभाज्याचे भाव उतरले आहेत. गडचिरोली येथील रविवारच्या आठवडी बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे भाव उतरले होते. परिणामी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
गडचिरोली येथील आठवडी बाजारात कांदे २० रूपये किलो, आलू १५ रूपये किलो, वांगे १५ ते २० रूपये किलो, टमाटर ५ ते १० रूपये किलो, चवळी शेंगा १० रूपये पाव, कारले १५ रूपये पाव, फुलकोबी २५ ते ३० रूपये किलो, पत्ताकोबी २० रूपये किलो, हिरवी मिरची १० रूपये पाव, वाटाणाच्या शेंगा ३० रूपये किलो दराने विकल्या जात होत्या. याशिवाय सांबार, मेथी, पालक भाजी, मूळा, गाजर यांचेही दर घसरले होते.
पावसाळ्यात येथील आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक कमी राहत होती. परिणामी दुप्पट ते तिप्पट दराने ग्राहकांना पालेभाज्या खरेदी कराव्या लागत होत्या. मात्र हिवाळ्यात शेतकऱ्यांकडील पालेभाज्या बाजारात आणल्या जात आहेत. तसेच मोठ्या शहरातूनही पालेभाज्याची आवक वाढली आहे. त्यामुळे भाजीपाला पूर्वीच्या तुलनेत स्वस्त झाला आहे.(स्थानिक प्रतिनिधी)