आदिवासींचा कलाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:38+5:30
सदर नृत्य स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी होते. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक धनंजय सेलोकर, अॅड. खान, रेखा तिपट्टी, भाऊराव जागदाबी हजर होते. आदिवासींच्या कला व संस्कृतीला वाव मिळण्यासाठी सदर रेला नृत्य स्पर्धा घेतली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गडचिरोली पोलीस दल व उपविभ्ज्ञागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचाच्या संयुक्त विद्यमाने पोलीस ठाण्याच्या प्रांगणात २० जानेवारी रोजी सोमवारला उपविभागीयस्तरीय आदिवासी रेला नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत युवक-युवती, महिला-पुरूष सर्व मिळून एकूण सहा चमूंनी सहभाग घेतला.
सदर नृत्य स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी होते. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक धनंजय सेलोकर, अॅड. खान, रेखा तिपट्टी, भाऊराव जागदाबी हजर होते.
आदिवासींच्या कला व संस्कृतीला वाव मिळण्यासाठी सदर रेला नृत्य स्पर्धा घेतली जात आहे. आदिवासींचा कलाविष्कार राष्ट्रीय पातळीवर पोहोचावा, यासाठी ही नृत्य स्पर्धा आहे. आदिवासींची कला व संस्कृती जपून ठेवणे गरजेचे आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वामी म्हणाले.
यापूर्वी आदिवासी रेला नृत्य स्पर्धा तालुक्यातील सहा पोलीस ठाण्यांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या चमूला उपविभाग स्तरावरील या स्पर्धेत स्थान देण्यात आले. सिरोंचा येथे आयोजित रेला नृत्य स्पर्धेत पोलीस स्टेशन सिरोंचा, बामणी, आसरअल्ली, रेगुंठा, पातागुडम, झिंगानुर आदी पोलीस ठाण्याच्या प्रत्येकी एक याप्रमाणे सहा चमूंनी सहभाग घेतला. स्पर्धेतील स्पर्धकांनी उत्कृष्ट रेला नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.
सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पोलीस दलाच्या पुढाकाराने आदिवासींसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण झाले आहे.