ठिकठिकाणी आदिवासी दिन साजरा
By Admin | Published: August 10, 2015 12:57 AM2015-08-10T00:57:02+5:302015-08-10T00:57:02+5:30
जिल्ह्यात आदिवासी दिनानिमित्त रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा, चांदाळा- येथे आदिवासी दिनाचे आयोजन रविवारी करण्यात आले.
रॅली : शाळा, महाविद्यायीन विद्यार्थी सहभागी
गडचिरोली : जिल्ह्यात आदिवासी दिनानिमित्त रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा, चांदाळा- येथे आदिवासी दिनाचे आयोजन रविवारी करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सोनुलाल किरंगे, कमल किरंगे, हजारे, हर्षे, पदा, उंदीरवाडे, चिंचोलकर, मडावी, सहारे, कुळमेथे, बुधीवाले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक ए. एम. बर्वे, संचालन ए. एम. नरूले तर आभार सहारे यांनी मानले. यशस्वितेसाठी सोमनकर, दोडके यांनी सहकार्य केले.
शासकीय आश्रमशाळा पोटेगाव- येथे आयोजीत आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच ओमकारेश्वर सडमाके यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी.सी. खांडवाये होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच प्रतिमा मोहुर्ले, सुधीर शेंडे, व्ही.एम. देसू, एस. आर. जाधव, वंदना देवतळे, वंदना खांडवाये, दिलीप चुलपार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवर तसेच अमित झूरी या विद्यार्थ्याने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी गोंडी नृत्य सादर केले. प्रास्ताविक के. जी. गेडाम, संचालन ए. डब्ल्यू बोरकर तर आभार व्ही. एम. नैताम यांनी मानले. यशस्वितेसाठी सी. आर.खांडरे, एन. ए. आलाम, जे. टी. पदा, एल. एम. मेश्राम, टी. आर. कापगते, एम. जी. वासेकर, वंदना गेडाम, पी. जी. भूरसे तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी सहकार्य केले.
शासकीय आश्रमशाळा रांगी- धानोरा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा रांगी येथे आयोजित कार्यक्रमाला मुख्याध्यापक मेश्राम, सोनकुसरे, प्रा. वाणी तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.
मुलांचे वसतिगृह आरमोरी- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहपाल शेंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून दिलीप टेकाम, श्यामजी टेकाम, दिलीप घोडाम, खोब्रागडे, गुलाब ताडाम, नरेश पुराम, हरीष दर्रो, प्रदीप कुमरे आदी उपस्थित होते. संचालन लुकेश नरोटे तर आभार संकेत कुमोटी यांनी मानले.
अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा मुरमाडी- येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. वाय. लांजेवार होते. प्रमुख अतिथी म्हणून के. सी. पटले, एस. टी. कलसार, रामटेके आदी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांनी गोंडी गीते गायली. संचालन सी. डी. फुलझेले तर आभार एस. टी. कलसार यांनी मानले. यशस्वीतेसाठी वाय. एम. भोयर यांनी मानले.
जिमलगट्टा - जागतिक आदिवासी दिनानिमित्त गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक व नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर घेण्यात आलेल्या अध्यक्षस्थानी सरपंच सरिता गावडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच मदन्ना नैताम, रंगया तलांडी, राकेश पोरतेट, बापू मडावी, मुख्याध्यापक ए. डब्ल्यू. हेमने, सयाम, साखरे, कडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व्ही. एन. बडगेलवार, ए. व्ही. भुजाडे यांनी मानले. (लोकमत न्युज नेटवर्क)