राज्यघटनेमुळे आदिवासींचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:55 PM2019-04-20T23:55:32+5:302019-04-20T23:56:15+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजासाठी जे काम केले, त्याची परतफेड, उपकार आदिवासी समाज फेडू शकत नाही. आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरांनी घटनेत तशी तरतूद करून ठेवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजासाठी जे काम केले, त्याची परतफेड, उपकार आदिवासी समाज फेडू शकत नाही. आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरांनी घटनेत तशी तरतूद करून ठेवली. त्यामुळेच आज हा समाज विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेत आहे. पण खेदाची बाब अशी की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आदिवासी समाज कार्यक्रमात येत नाही, अशी खंत सरपंच राजेश नैताम यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्ताने कोटगूल येथे गुरूवार १८ एप्रिलला कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतापसिंह गजभिये होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नसिर जुमन शेख, डॉ.महेश कोपूलवार, जगदीश बद्रे, मुख्याध्यापक शालीकराम कराडे, मुख्य अतिथी म्हणून कोटगूलचे सरपंच राजेश नैताम, पत्रकला जनबंधू, सुदाराम सहारे, नकूल सहारे, लालचंद जनबंधू, पांडूरंग उंदीरवाडे उपस्थित होते. जगदीश बद्रे यांनी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा कशा दूर करता येईल, त्यामुळे समाज कसा गरीब झाला, हे सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. डॉ. महेश कोपूलवार, नसिर शेख, शालीकराम कराडे, पत्रकला जनबंधू, सुदाराम सहारे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी अंताराम टेंभूर्णे, बिरसिंग उमरे, अनिल जनबंधू, कंथलाल टेंभूर्णे, चंद्रशेखर उमरे, राकेश राहुल, वीरेंद्र टेंभूर्णे, यशवंत नंदेश्वर व समाजबांधवांनी सहकार्य केले.
अंधश्रद्धा समाजासाठी घातकच
विज्ञानाने विविध क्षेत्रात प्रगती झाली. अनेक महापुरूषांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केले. तरी सुद्धा समाजात अंधश्रद्धा पाळली जाते. अंधश्रद्धा समाजासाठी घातक असून समाज विकसित होऊ शकत नाही. पारंपरिक अंधश्रद्धा व रितीरिवाजात तो गुरफटतो. त्याची आर्थिक प्रगतीही खुंटते. त्यामुळे नागरिकांनी अंधश्रद्धा पाळू नये. ती दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सूर उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमादरम्यान काढला. तसेच बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले.