आदिवासी विकास परिषदेने वाहिली केराम यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:26 AM2021-06-03T04:26:24+5:302021-06-03T04:26:24+5:30
गडचिरोली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आर.यू. केराम यांचे २९ मे रोजी नागपूर येथे अल्पशा ...
गडचिरोली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आर.यू. केराम यांचे २९ मे रोजी नागपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आदिवासी विकास परिषदेसह आदिवासी चळवळीची अपरिमित हानी झाली, अशी शोकसंवेदना व्यक्त करत आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी अखेरपर्यंत कार्य केले. त्यांच्या जाण्याने परिषदेची मोठी हानी झाल्याची शोकसंवेदना परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव पिचड, राज्य अध्यक्ष माजी आ.वैभव पिचड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. विदर्भ अध्यक्ष मनिराम मडावी, कार्याध्यक्ष नामदेवराव मसराम, गडचिरोली जिल्हाध्यक्ष घनश्याम मडावी, विदर्भ संपर्क प्रमुख सचिन पालकर, विदर्भ महासचिव डॉ.आरती पुफाटे, विदर्भ कोषाध्यक्ष सूर्यकांत उईके, जयप्रकाश उईके, विदर्भ सचिव उत्तमराव गेडाम, बुलडाणा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरराव सोळंके, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नरेश गेडाम, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रमोद बोरीकर, वर्धा जिल्हाध्यक्ष शरद आडे, विदर्भ युवा सचिव राजू पांडे,महेबूब केदार, योगानंद उईके , माजी नगरसेविका वर्षा शेडमाके तसेच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आर.यू.केराम यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.