आदिवासींनी गोंडी संस्कृती जपावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:03 PM2018-01-21T23:03:29+5:302018-01-21T23:03:42+5:30
गोंडियन महिलांनी गोंडी संस्कृतीचे जतन करून त्याचे पालन करावे तसेच आदिवासी गोंडी संस्कृती जपावी, असा सूर इंदौरच्या साहित्यिका तथा गोंडी धर्म प्रचारिका सुशीला धुर्वे व मान्यवरांनी काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : गोंडियन महिलांनी गोंडी संस्कृतीचे जतन करून त्याचे पालन करावे तसेच आदिवासी गोंडी संस्कृती जपावी, असा सूर इंदौरच्या साहित्यिका तथा गोंडी धर्म प्रचारिका सुशीला धुर्वे व मान्यवरांनी काढला.
लगाम येथे इलाखा ग्रामसभा तर्फे आयोजीत राज्यस्तरीय गोंडी धर्म संमेलन व सामाजिक प्रबोधन मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आदिवासी महिलांना इतर धर्माकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र महिलांनी आपल्या घरी मुलांना पेरसापेनबद्दल माहिती देऊन गोंडी धर्माविषयी सविस्तर सांगावे, असे प्रतिपादन केले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना प्रदेशचे जागोसमा खुशालसिंह सुरपाम होते. प्रमुख पाहुणे म्हणून राजे वीरेंद्रशहा आत्राम, वर्धाचे गोंडी धर्म प्रचारक मारोती उईके, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, अवचितराव सयाम, रंजना उईके, जि.प. समाजकल्याण सभापती माधुरी संतोष उरेते, जि.प सदस्य लालसू नोगोटी, डॉ. पीतांबर कोडापे, पिसाजी कुळमेथे, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, दौलत धुर्वे, शामराव उइके आदी उपस्थित होते. याप्रसंगी समाजासाठी उल्लेखनीय काम करणाºया आदिवासी कर्मचारी तसेच पदाधिकाºयांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरम्यान अधून मधून गोंडी नृत्य सादर करण्यात आले. संचालन संतोष सोयाम, प्रास्ताविक ज्योतीराव गावडे तर आभार कालिदास कुसनाके यांनी मानले. जानकीराम कुसनाके, दिवाकर वेलादी, आनंदराव सिडाम, संतोष सोयाम, कालीदास कुसनाके, अरुण मडावी, देवराव कुसनाके, दिनेश कुसनाके, मारोती दब्बा, सुधाकर सिडाम, महादेव सिडाम, मीराजी मडावी, संतोष नैताम, दीपक मडावी, पुरूषोत्तम सोयाम, रूपेश मडावी, कृष्णा गावडे, मोहन मडावी, संतोष दब्बा, गिरमा मडावी, देवाजी सिडाम, रमेश सिडाम, हणमंतू मडावी यांनी सहकार्य केले.