जंगल वाचवण्यासाठी आदिवासींनी घेतली ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:37 AM2019-03-15T10:37:59+5:302019-03-15T10:38:28+5:30
वणव्यामुळे जंगलातील मौल्यवान वनसंपदा नष्ट होऊन त्याचा पर्यावणावर विपरित परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजनांची चर्चा करण्यासाठी भामरागड तालुक्यातील इरपनारच्या आदिवासींनी गुरुवारी ग्रामसभा घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: वणव्यामुळे जंगलातील मौल्यवान वनसंपदा नष्ट होऊन त्याचा पर्यावणावर विपरित परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजनांची चर्चा करण्यासाठी भामरागड तालुक्यातील इरपनारच्या आदिवासींनी गुरुवारी ग्रामसभा घेतली.
तेंदूपत्ता हंगामात कूट कटाईच्या वेळी तसेच मोहफूल गोळा करण्याकरिता झाडाखाली आग लावण्याची परंपरा आहे. त्यामुळे लागणाऱ्या वणव्यात जंगल नष्ट होत आहे. यात होत असलेले वनोपजांचे नुकसान रोखण्यासाठी ही सभा घेण्यात आली. सभेस माजी सरपंच मलमपोडुरचे तथा विधमान ग्रा पं सदस्या सुधाकर तिम्मा, गावातील नागरिक उपस्थित होते.
सभेत गावातील कोणीही अवैधरित्या वृक्षतोड करू नये, अतिक्रमण करू नये, जंगलाला आग लावू नये व वणवा रोखावा असे मुद्दे मांडण्यात आले. भावी पिढीसाठी जंगल सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असून ती प्रत्येकाने कसोशीने पाळावी यावर चर्चा करण्यात आली.