अहेरी, एटापल्लीसह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघाची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:37 AM2021-01-25T04:37:04+5:302021-01-25T04:37:04+5:30

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आधीपासूनच गावागावात जनसंपर्क वाढवून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्याचा फायदा त्यांना बऱ्याच ...

Tribal student teams in many places including Aheri, Etapalli | अहेरी, एटापल्लीसह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघाची बाजी

अहेरी, एटापल्लीसह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघाची बाजी

googlenewsNext

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आधीपासूनच गावागावात जनसंपर्क वाढवून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्याचा फायदा त्यांना बऱ्याच प्रमाणात झाला. सोबत माजी आमदार दीपक आत्राम यांनीही प्रचारात पुढाकार उमेदवारांचे मनोबल वाढवले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात उमेदवारांनी चांगली स्पर्धा निर्माण केली. पण, ग्रामसभेने आपले उमेदवार उभे करत दुहेरी असणारी स्पर्धा काही ठिकाणी तिहेरी केली. आता सरपंचपदाच्या निवडणुकीत ग्रामसभा आणि काँग्रेसबहुल पॅनलचे काही सदस्य आविसंच्या बाजूने झुकल्यास ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवण्यात त्यांना बऱ्याच प्रमाणात यश येऊ शकते.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही अनेक ग्रामपंचायतींवर आपल्या पॅनलचे वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. आता सरपंचपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते, यावर बरीच गणिते अवलंबून राहतील. कोणत्या गटाचा सरपंच बसणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Web Title: Tribal student teams in many places including Aheri, Etapalli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.