लाहेरीत मालू बाेगामी यांना वाहिली श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:48+5:302021-02-14T04:34:48+5:30
लाहेरी : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे आदिवासी समाजाचे कार्यकर्ते मालू काेपा बाेगामी यांना पुण्यतिथीनिमित्त बुधवारी पोलीस व ग्रामस्थांनी श्रद्धांजली ...
लाहेरी : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे आदिवासी समाजाचे कार्यकर्ते मालू काेपा बाेगामी यांना पुण्यतिथीनिमित्त बुधवारी पोलीस व ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली. मालू कोपा बोगामी यांचा जन्म दिनांक १८ ऑगस्ट १९४८ मध्ये झाला. त्यांनी आपल्या हयातीत लाहेरी गावात रस्ते, वीज, पाणी, पूल, एसटी बस सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, आश्रम शाळा, जिल्हा परिषद शाळा अशा विविध सोयी- सुविधा निर्माण करण्यासाठी पाठपुरावा केला. यात त्यांना यश आले. मात्र, समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ काही समाजकंटकांना बघविली नाही. त्यातूनच १० फेब्रुवारी २००२ रोजी त्यांची निर्घृण हत्या झाली, अशी माहिती उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमादरम्यान दिली. लाहेरी येथील मुख्य चौकात त्यांच्या स्मृतिस्थळावर कार्यक्रम घेऊन दाेन मिनिटे माैन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी लाहेरी उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पीएसआय महादेव भालेराव, पीएसआय अजय राठोड, श्यामराव येरकलवार, सरपंच पिंडाला बोगामी, नाना भांडेकर, मुख्याध्यापक वासुदेव ठमके, लक्ष्मीकांत बोगामी उपस्थित होते. बाेगामी यांनी एटापल्लीचे पं.स. सभापती, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि भामरागडचे पं.स. सभापती पद तसेच आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक पद भूषविले हाेते.