शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:32 AM2019-03-28T00:32:28+5:302019-03-28T00:32:47+5:30
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने मंगळवारी तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊन कुरखेडाच्यापंचायत समितीवर धडक देण्यात आली. दरम्यान यावेळी बीडीओ व गटशिक्षणाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने मंगळवारी तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊन कुरखेडाच्यापंचायत समितीवर धडक देण्यात आली. दरम्यान यावेळी बीडीओ व गटशिक्षणाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करण्यात यावी, पंचायत समिती अंतर्गत सेवा विषयक नोंद घेण्यात यावी, प्राथमिक शिक्षकांच्या अर्जित रजा निकाली काढण्यात याव्या, येथील शिक्षण विभागातील वरीष्ठ लिपीकाचे पद भरण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी शिक्षकांच्या चटोपाध्याय व निवड श्रेणी व त्यांचे विविध स्तरावरून सेवा विषयक गहाळ कागदपत्राबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्या मार्गी लावण्याकरिता संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी पी. एल. मरसकोल्हे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र शिवणकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष अनिल मूलकलवार, विभागीय उपाध्यक्ष श्रीकृष्ण ऊईके, तालुका अध्यक्ष मूरली सयाम, सरचिटणीस धीरज सहारे, विलास बन्सोड, एकनाथ नागपूरकर, रवी गावंडे, शामसिंगं गंगाकाचूर, महेबूब खां पठान, बलाराम नरोटे, हरीदास गावळ, राजन गजभिये, लक्ष्मण हलामी, दिगांबर कुळमेथे, संजय कोकोडे, केवळराम खुणे, यशवंत जूरेसिया, यशवंत केरामी, वच्छला नरोटे उपस्थित होते.