वैकल्पिक वादांचे निवारण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:02 AM2018-01-18T01:02:13+5:302018-01-18T01:02:26+5:30
वैकल्पिक वाद निवारण पद्धती व त्यापासून होणारे फायदे तसेच मानवाचे मूलभूत अधिकार व जतनेचे कर्तव्य यावर मार्गदर्शन करून वैैकल्पिक निवारण पद्धती व त्यापासून होणारे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवावे, असे प्रतिपादन चामोर्शीचे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर)......
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : वैकल्पिक वाद निवारण पद्धती व त्यापासून होणारे फायदे तसेच मानवाचे मूलभूत अधिकार व जतनेचे कर्तव्य यावर मार्गदर्शन करून वैैकल्पिक निवारण पद्धती व त्यापासून होणारे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवावे, असे प्रतिपादन चामोर्शीचे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष एम. झेड. ए. ए. क्यू. कुरैशी यांनी केले.
तालुका विधीसेवा समिती चामोर्शीच्या वतीने मंगळवारी स्थानिक केवळराम हरडे कृषी महाविद्यालयात वैकल्पिक वाद निवारण पद्धती व त्याचे फायदे, मूलभूत अधिकार व नागरिकांचे कर्तव्य, समान न्याय व मोफत विधीसेवा या विषयावर कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ते मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाला सह दिवाणी न्यायाधीश एल. डी. कोरडे, अॅड. अनंत उंदीरवाडे, तालुका वकील संघाचे अॅड. के. टी. सातपुते, सचिव अॅड. एम. डी. सहारे, प्राचार्य डॉ. दिनेश सुर्जे उपस्थित होते.
दरम्यान उपस्थित मान्यवरांनी मूलभूत अधिकार तसेच व्यसनांचे दुष्परिणाम यासह विविध बाबींवर मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी म. मा. पुणेकर, पी. डी. कोसारे, व्ही. पी. गांगरेड्डीवार, संतोष चलाख व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.