मुरूमाची चाेरी करणारे दाेन ट्रक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:33 AM2021-03-07T04:33:56+5:302021-03-07T04:33:56+5:30
रेव्हेन्यू इन्स्पेक्टर श्रीरामे यांच्याद्वारे माेका पंचनामा करण्यात आला. राॅयल्टी मध्ये खोडतोड करून मुरूमाची अवैध वाहतूक करणारे दोन्ही ट्रक तसेच ...
रेव्हेन्यू इन्स्पेक्टर श्रीरामे यांच्याद्वारे माेका पंचनामा करण्यात आला. राॅयल्टी मध्ये खोडतोड करून मुरूमाची अवैध वाहतूक करणारे दोन्ही ट्रक तसेच खोडतोड करण्यात आलेले दोन रायल्टी पत्र तहसील कार्यालय चामोर्शी येथे जमा करण्यासाठी नेण्यात आले. मात्र चामोर्शी तहसील कार्यालयात रेव्हेन्यू इन्स्पेक्टर श्रीरामे यांनी खोडतोड करण्यात आलेले दोन तसेच पुन्हा नवीन दोन असे चार रायल्टी पत्र तहसीलदार यांना सादर करून अवैध वाहतूक व चोरी होत नसल्याचेच भासवल्याने रेव्हेन्यू इन्स्पेक्टर यांनी केलेल्या कारवाईवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मोका पंचनामाच्या वेळेस दोन तर तहसील कार्यालयात चोरीच्या वाहतुकीच्या ट्रक जमा केल्यानंतर चार रॉयल्टी आल्या कुठून, जर रॉयल्टी मध्ये काहीही अवैध किंवा खोडतोड नव्हती तर चित्तरांजनपूर येथून चामोर्शी येथे ट्रक का आणले. रस्त्यामध्ये रेव्हेन्यू इन्स्पेक्टर व चोरीची वाहतूक करणारी कंपनी यामध्ये तर साटेलोटे झाले नाहीत ना,असे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
रॉयल्टी मध्ये खोडतोड करून अवैध वाहतूक प्रकरणी चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तसेच संपूर्ण चौकशी होईपर्यंत दोन्ही वाहने तहसील कार्यालयात जमा राहतील अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
बाॅक्स
मुरूम चाेरीसाठी मॅजिक पेनचा वापर
सदर ट्रक चालकाकडे रॉयल्टीची मागणी केली असता कंपनीद्वारे अवैध मुरुम चोरीकरिता करण्यात येत असलेला नवीनच प्रकार उघडकीस आला. चक्क रॉयल्टीवर अगरबत्तीची शाई घोटून रॉयल्टीच्या तारखेमध्ये व वेळेमध्ये खोडतोड करण्यात आली हाेती. एकच रॉयल्टी दिवसभर मुरुम वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. असा वापर इतरही ठिकाणी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.