ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:38 AM2017-08-11T00:38:50+5:302017-08-11T00:40:22+5:30
ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील कुनघाडा रै. बसथांब्याजवळ घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी मो. : ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील कुनघाडा रै. बसथांब्याजवळ घडली.
श्रीकृष्ण वामन काटवे (३८) रा. कुनघाडा असे मृतकाचे नाव आहे. श्रीकृष्ण काटवे हा एमएच ३३ एस ७२६६ क्रमांकाच्या दुचाकीने गुरूवारी सकाळी तांबाशी येथे इंजिन दुरूस्त करणाºया मेकॅनिककडे जात होता. दरम्यान एमएच ३४ एबी ८८९५ क्रमांकाचा ट्रक गडचिरोलीवरून चामोर्शीकडे जात होता. या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार श्रीकृष्ण काटवे यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबतची माहिती पोलीस पाटील दिलीप पवार यांना कळताच पोलीस उपनिरिक्षक मल्हार थोरात यांना भ्रमणध्वनीवरून याबाबतची माहिती दिली. त्यांनी चामोर्शी जवळच ट्रकला पकडले. मात्र ट्रक ड्रायवर पसार झाला. ट्रकने श्रीकृष्ण काटवे यांना २० फूटापर्यंत दुचाकीसह फरफटत नेले. यामुळे त्यांच्या हातपाय तुटून डोक्याचाही चेंदामेंदा झाला. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवाहू वाहनाच्या धडकेत एक ठार
आष्टी : आष्टीवरून दुचाकीने चौडमपल्ली येथे जात असलेल्या दुचाकीला आलापल्लीवरून भरधाव वेगाने येणाºया पिकअप वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चंदनखेडी गावाजवळ घडली.
नागेश शंकर सिडाम (२१) रा. रामय्यापेठ ता. सिरोंचा असे मृतकाचे नाव आहे. नागेश हा आष्टी परिसरात ट्रॅक्टरने नांगरणीचे काम करण्यासाठी आला होता. ट्रॅक्टरचे डिझेल संपल्याने तो आष्टी येथून पेट्रोल डिझेल घेऊन परत चौडमपल्ली येथे जात होता. दरम्यान आलापल्लीवरून आष्टीकडे येणाºया एमएच ३३-१८१४ या क्रमांकाच्या टाटा पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये नागेश सिडाम हा जागीच ठार झाला. तर विक्की सुरेश लखमवार (१८) हा गंभीर जखमी झाला. त्याला गडचिरोली येथील रूग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळावरून चालक पसार झाला. सदर वाहन गणेश ट्रान्सस्पोर्ट तळोधी मो. येथील गणेश देवराव दुधबळे यांच्या मालकीचे आहे.