सिंचन क्षमता वाढीसाठी प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:15 PM2017-09-18T23:15:56+5:302017-09-18T23:16:12+5:30
देसाईगंज तालुक्यातील मामा तलाव, बोड्या यासारख्या सिंचनाच्या साधनांची महात्मा गांधी रोजगार हमी योजना.....
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील मामा तलाव, बोड्या यासारख्या सिंचनाच्या साधनांची महात्मा गांधी रोजगार हमी योजना व इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून पाणी साठवण क्षमता वाढवून सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश आमदार कृष्णा गजबे यांनी दिले.
देसाईगंज येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीप्रसंगी आमदार कृष्णा गजबे बोलत होते. आढावा बैठकीला जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशनी पारधी, संवर्ग विकास अधिकारी सुनिता भांगरे, पंचायत समिती सभापती मोहन गायकवाड, उपसभापती गोपाल उईके, नगर परिषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा यांच्यासह पंचायत समिती गणाचे सदस्य तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, सचिव, कृषी विभाग, सिंचाई विभाग, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीदरम्यान पुढे मार्गदर्शन करताना आमदार गजबे म्हणाले, सिंचन क्षमता वाढल्यास गावातील शेतकºयांना पिकांसाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. तलावांमध्ये वर्षभर पाणी साचून राहिल्यास मासेमारीचा व्यवसाय वाढीस लागण्यास मदत होईल. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी शेतीचा विकास होणे आवश्यक आहे. शेतीतून अधिक उत्पादन निघाल्यास शेतकºयांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेऊन शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार अभियान, गाळ उपसा योजना आदींच्या माध्यमातून सिंचनाच्या साधनांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारने मागेल त्याला शेततळे, विहिरी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांसाठी राज्य शासन कधीच निधीची कमतरता भासू देणार नाही. अधिकारी व पदाधिकाºयांनी शेतकºयांच्या मागणीनुसार योजनांची अंमलबाजवणी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. यशस्वीतेसाठी तहसील कार्यालयातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.