विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:23 AM2021-07-19T04:23:43+5:302021-07-19T04:23:43+5:30
तळाेधी (माे.) : काेराेनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेऊन विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन तळाेधी ...
तळाेधी (माे.) : काेराेनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेऊन विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन तळाेधी केंद्राचे केंद्रप्रमुख गाैतम मेश्राम यांनी केले.
तळाेधी केंद्राची पहिली शिक्षण परिषद १३ जुलै राेजी घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन केंद्रप्रमुख गाैतम मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनाेहर बाेदलकर हाेते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशाेर कुनघाडकर, दामिणी गेडाम, मुख्याध्यापक वसंत सहारे, मुख्याध्यापिका प्रतिभा आकरे, नरेश जाम्पलवार, अमरसिंग नाईक, भाऊराव चव्हाण, पंचायत समिती सदस्य सुभाष वासेकर आदी उपस्थित हाेते.
पुष्पा मानकर यांनी ‘ताेताेचान’ या प्रेरणादायी पुस्तकाचा परिचय शिक्षकांना करून दिला. अब्दुल रशीद शेख, प्रतिभा आकरे, विनाेद गम्पावार यांनी काेविड काळात मुलांसाठी राबविलेल्या प्रेरणादायी उपक्रमांचे सादरीकरण केले. नीलेश विश्राेजवार, प्रशांत बनकर, पुष्पा मानकर यांनी सेतू अभ्यासक्रम याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. गाैतम मेश्राम यांनी १०० टक्के पटनाेंदणी, दूरदर्शनवरील कार्यक्रम, रेडिओ कार्यक्रम, दीक्षा ॲप, काेविड लसीकरण याविषयी मार्गदर्शन केले. ढिवरू दुधबळे यांनी काेविडपूर्व उपक्रमांच्या अंमलबजावणीचा व्हिडिओ सादर केला. त्याला जयंत मानकर यांनी तांत्रिक साहाय्य केले. सूत्रसंचालन प्रशांत बनकर तर आभार वसंत सहारे यांनी मानले. परिषदेला जवळपास ५० शिक्षक उपस्थित हाेते.