क्षयरुग्णांचे पाेषण लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:37 AM2021-08-15T04:37:46+5:302021-08-15T04:37:46+5:30

बाॅक्स महिन्याला ८० रुग्ण आढळतात जिल्हाभरात महिन्याला जवळपास ८० रुग्ण आढळून येतात. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत ...

Tuberculosis patients hang out | क्षयरुग्णांचे पाेषण लटकले

क्षयरुग्णांचे पाेषण लटकले

Next

बाॅक्स

महिन्याला ८० रुग्ण आढळतात

जिल्हाभरात महिन्याला जवळपास ८० रुग्ण आढळून येतात. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत ५५० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी बहुतांश रुग्णांना अनुदान दिले जात आहे. काही रुग्णांचे बँक खाते नसल्याने त्यांना अनुदान मिळाले नाही. बँक खाते काढल्याबराेबर अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जणार आहे.

बाॅक्स

क्षयराेगाची लक्षणे काय

एखाद्या व्यक्तीला सतत दाेन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खाेकला असणे, वजन कमी हाेणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु सायंकाळी ताप येणे, छातीत दुखणे, रात्री घाम येणे आदी लक्षणे दिसून येतात.

काेट

क्षयराेगावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. नागरिकांनी क्षयराेगाची लक्षणे आढळून येताच आशावर्कर, परिचारिका यांच्याशी संपर्क साधावा. राेगाचे निदान हाेताच उपचार सुरू केेले जातात.

डाॅ. सचिन हेमके, जिल्हा क्षयराेग अधिकारी

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

एकूण रुग्ण-५५०

Web Title: Tuberculosis patients hang out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.