वाघाच्या बंदाेबस्तासाठी मंगळवारी माेर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:35 AM2021-09-13T04:35:40+5:302021-09-13T04:35:40+5:30
१४ निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या व गाई, म्हशी, बकऱ्या फस्त करणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडून त्याचा बंदाेबस्त करावा. वन ...
१४ निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या व गाई, म्हशी, बकऱ्या फस्त करणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडून त्याचा बंदाेबस्त करावा. वन अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचे गुन्हा नोंद करा. अकार्यक्षम वनाधिकारी व वन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करा. चुरचुरा येथील अंदाजे ४० एकर जागेत अवैद्य वृक्षतोड करून वनसंपत्तीचा ऱ्हास करणाऱ्या दोषी वनरक्षक, वनपाल, वनपरीक्षेत्राधिकारी, तलाठी यांचेवर तातडीने निलंबनाची कार्यवाही करून त्यांचेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंद करावे आदी मागण्यांसाठी माेर्चा काढला जाणार आहे. मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ समाजसेवक देवाजी ताेफा, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त डाॅ. शिवनाथ कुंभारे, भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, जिल्हा संपर्क प्रमुख योगेश कुडवे, रमेश बांगरे, नीलकंठ संदोकर आदी करणार आहेत. नागरिकांनी आंदाेलनात सहभागी हाेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.