तुकाराम माकडे अनेक पदकांनी विभूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:42 AM2021-08-17T04:42:05+5:302021-08-17T04:42:05+5:30
दरवर्षी स्वातंत्र्यदिन असो की प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयातील ध्वजाराेहण सभारंभात उपस्थित राहतात. परंतु त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यापोटी ते आता येऊ ...
दरवर्षी स्वातंत्र्यदिन असो की प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयातील ध्वजाराेहण सभारंभात उपस्थित राहतात. परंतु त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यापोटी ते आता येऊ शकत नसल्याने दिलगिरी व्यक्त करतात. यावेळी आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर जुआरे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तब्येतीची विचारपूस केली. सन १९६५ ला पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये सैन्य घुसखाेरी करण्याच्या उद्देशाने भारताशी संघर्ष सुरू केला. हे युद्ध १७ दिवस चालले, असे माकडे यांनी सांगितले.
या युद्धात तुकाराम माकडे यांनी आपले बहुमूल्य योगदान दिले. तसेच सन १९७१ सालातील ३ डिसेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा निर्णायक पराभव झाला व देशाची निर्मिती झाली. या युद्धादरम्यान ते भारतीय सैन्यात होते. त्यांनी सेनेतील १८ वर्षांच्या कार्यकाळात पंजाब, सुरजपूर, आसाम, दार्जिलिंग, जम्मू काश्मीरच्या सीमा भागात देशाच्या सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सांभाळून आपले आयुष्य भारतमातेसाठी अर्पण केले. आयुष्याच्या ८२ वर्षांनीसुद्धा तीच जिद्द, चिकाटी, स्वाभिमान व राष्ट्रप्रेम त्यांच्यात दिसून येते.