देसाईगंज येथे तुकाराम बीज उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:33 AM2021-04-03T04:33:24+5:302021-04-03T04:33:24+5:30
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कीर्तनकार वासुदेव गोठे महाराज, प्रमुख अतिथी म्हणून हार्मोनियम वादक मोतिलाल नंदनवार, प्रा. प्रशांत दोनाडकर, मधुकर ...
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कीर्तनकार वासुदेव गोठे महाराज, प्रमुख अतिथी म्हणून हार्मोनियम वादक मोतिलाल नंदनवार, प्रा. प्रशांत दोनाडकर, मधुकर शेंदरे, विश्वनाथ सहारे, प्रभाकर भागडकर, पवन गाडगे, पंकज खुणे, धीरज नाकतोडे, श्यामराव मोहुर्ले उपस्थित होते. कीर्तनकार वासुदेव महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यावर माहिती दिली. तसेच तुकाराम बीज महोत्सवाचे महत्त्व कीर्तनातून समजावून सांगितले. हार्मोनियम वादक मोतिलाल नंदनवार यांनी सुद्धा उपस्थितांचे प्रबोधन केले. मागील २० वर्षापासून मोतिलाल नंदनवार हार्मोनियम वादनाच्या माध्यमातून समाच प्रबोधन करीत आहेत. त्याबद्दल त्यांचा गोठे महाराज यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन उमेश सोनकुसरे, प्रास्ताविक त्र्यंबक शेंदरे तर आभार प्रभाकर भागडकर यांनी मानले. काेविड-१९ च्या नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला.