तुळशी ग्रा. पं. ला स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार
By admin | Published: May 2, 2017 01:16 AM2017-05-02T01:16:41+5:302017-05-02T01:16:41+5:30
संपूर्ण ग्राम पंचायत डिजिटल, संगणकीकृत नोंद यासह विविध सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या ...
१० लाखांचे बक्षीस : पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव
तुळशी : संपूर्ण ग्राम पंचायत डिजिटल, संगणकीकृत नोंद यासह विविध सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तुळशी ग्राम पंचायतीला तालुकास्तरावर ‘स्मार्ट ग्राम अभियान’ प्रथम पुरस्कार पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते १ मे रोजी देण्यात आला. १० लाख रूपये व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्मार्ट ग्राम अभियानांतर्गत संपूर्ण ग्राम पंचायत डिजिटल, संगणकीकृत, प्रशस्त इमारत, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, हागणदारीमुक्त ग्राम, पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न, डिजिटल शाळा यासह विविध उपक्रम तुळशी ग्रा. पं. ने राबविले आहे. ग्राम पंचायतीने सन २०१६-१७ या वर्षात स्मार्ट ग्राम अभियानात तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. त्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. सरपंच रेखा तोंडफोडे, ग्रामसेवक दिवाकर निंदेकार यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी जिल्हाधिकारी व अधिकारीवर्ग हजर होते. (वार्ताहर)