रेशन दुकानांतून तूरडाळ गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:54 AM2021-02-05T08:54:59+5:302021-02-05T08:54:59+5:30
गोरगरीब कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत शासनाकडून अत्यंत कमी किमतीत धान्य उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने गहू व तांदळाचा ...
गोरगरीब कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत शासनाकडून अत्यंत कमी किमतीत धान्य उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने गहू व तांदळाचा समावेश आहे. अधूनमधून तूर व चणा डाळीचासुद्धा पुरवठा केला जात हाेता. खुल्या बाजारपेठेतील डाळीपेक्षा स्वस्त धान्य दुकानातील डाळ स्वस्त राहत असल्याने लाभार्थी डाळीची उचल करत हाेते. लाॅकडाऊनच्या कालावधीत एप्रिल ते नाेव्हेंबर या महिन्यांमध्ये गहू, तांदळासाेबतच प्रत्येक कार्डधारकाला १ किलाे तूरडाळ अगदी माेफत उपलब्ध करून देण्यात आली हाेती. नाेव्हेंबरनंतर आता तुरीच्या डाळीचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे.
बाॅक्स .....
मक्याला नापसंती
लाॅकडाऊनच्या कालावधीत ऑगस्ट ते नाेव्हेंबरपर्यंत गव्हाला पर्याय म्हणून प्रती व्यक्ती १ किलाे मका दिला जात हाेता. मक्याचा दर्जा अतिशय खराब हाेता, तसेच मक्यापासून नेमके काेणते पदार्थ बनवावे, याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांना नसल्याने लाभार्थी मक्याच्या पुरवठ्याविषयी नाराज हाेते. आता मक्याचा पुरवठा बंद झाला आहे. जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र वाढत आहे. शेतकऱ्यांकडला मका आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केला जाते. पुढे हाच मका नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित केला जाते.
बाॅक्स ......
तूरडाळ उपलब्ध करून देण्याची मागणी
तूरडाळीमध्ये माेठ्या प्रमाणात प्राेटिन राहतात. त्यामुळे तुरीची डाळ आराेग्यासाठी पाेषक मानली जाते. दैनंदिन आहारात तूरडाळीचा वापर हाेतो; मात्र खुल्या बाजारपेठेत तुरीची डाळ जवळपास १०० रुपये किलाे आहे. एवढी महाग डाळ खरेदी करणे गरीब कुटुंबाला शक्य हाेत नाही. त्यामुळे या डाळीचा पुरवठा रेशन दुकानांतून करण्याची मागणी हाेत आहे.
बाॅक्स ...
एकूण रेशनकार्डधारक
२,२६,५८८
पिवळे कार्डधारक
९२,१३४
केशरी कार्डधारक
९६,५५७
पांढरे कार्डधारक
६,६९७