अळीमुळे तूर पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:20 PM2018-01-29T22:20:51+5:302018-01-29T22:21:18+5:30

जिल्हाभरात सुमारे दोन हजार पेक्षा अधिक हेक्टरवर तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे.

Turmeric risks due to larvae | अळीमुळे तूर पीक धोक्यात

अळीमुळे तूर पीक धोक्यात

Next
ठळक मुद्देशेंगा पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव : कृषी विभागाच्या पीक पाहणी अहवालातील निष्कर्ष

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्हाभरात सुमारे दोन हजार पेक्षा अधिक हेक्टरवर तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. तूर पिकाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाने गुंडाळणाऱ्या व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे कृषी विभागाने केलेल्या पीक पाहणीमध्ये दिसून आले आहे. यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कोरडवाहू क्षेत्रावर तसेच धानाच्या पाऱ्यावर तूर पिकाची लागवड केली जाते. जास्तीत जास्त क्षेत्रावर जास्त कालावधीत निघणाऱ्या तूर पिकाची लागवड केली जाते. पावसाळ्याच्या सुरूवातीला लावलेले पीक मार्च महिन्यामध्ये निघते. डिसेंबर महिन्यात फूल येण्यास सुरूवात होऊन जानेवारी महिन्यात शेंगा परिपक्व होण्यास सुरूवात होते. सद्य:स्थितीत बहुतांश शेंगा परिपक्व होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र तूर पिकावर पाने गुंडाळणारी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मावा रोगही लागला आहे.
यावर्षी धानाचे अल्प उत्पादन झाले. त्यामुळे तूर पिकाचे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग बाळगून होता. मात्र तूर पिकावरही विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने तुरीच्या उत्पादनातही कमालीची घट होण्याची शक्यता आहे.
तूर पिकाची लागवड धानाच्या बांधीच्या पाऱ्यावर केली जाते. धान पीक निघाल्यानंतर ओलावा कमी होण्यास सुरूवात होते. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी महिन्यात पाऊस झाल्यास तूर पिकासाठी संजीवणी ठरते. मात्र आॅक्टोबर महिन्यानंतर पाऊस आला नाही. त्यामुळे ओलावा नष्ट होऊन तूर पीक सुकणार आहे. याचाही परिणाम उत्पादनावर होणार आहे.
उन्हाळी पिकांकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष
गडचिरोली जिल्ह्यात जवळपास सात हजार हेक्टरवर उन्हाळी धानपिकाची लागवड केली जाते. सिंचन विहिरींमुळे सिंचनाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याचबरोबर उन्हाळी धान पिकाची लागवडीचे क्षेत्रही वाढतीवर आहे. जवळपास ७ हजार हेक्टरवर उन्हाळी धान पिकाची लागवड केली जाते. मात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय या पिकांचे कोणतेही नियोजन करीत नाही. त्यामुळे शेतकºयांना योग्य मार्गदर्शन सुध्दा मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. पारंपरिकरितीने शेतकरी उन्हाळी धान पिकाची लागवड करीत आहेत. या शेतकºयांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध करून देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास उन्हाळी धान पिकाचे उत्पादन व क्षेत्र पुन्हा वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतांश भागात उन्हाळी धान पिकाच्या रोवणीला सुरूवात झाली आहे. मात्र यावर्षी नेमक्या किती हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी धान पिकाची लागवड होणार आहे, याची माहिती सुध्दा कृषी विभागाकडे नाही. यावरून कृषी विभाग उन्हाळी धान पिकाबाबत किती उदासीन आहे, हे दिसून येते.
घाटेअळीचा प्रादुर्भाव
धानपीक निघाल्यानंतर त्याच बांधीत काही शेतकरी हरभरा पिकाची लागवड करतात. गडचिरोली जिल्ह्यात हरभरा पिकाचे ३ हजार ५९० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यावर्षी सुमारे २ हजार ६६५ हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड झाली आहे. मागील आठवड्यात झालेल्या पीक पाहणीत हरभरा पीक फुलोरा अवस्थेत आढळून आले आहे. या पिकावर काही प्रमाणात घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. घाटेअळीमुळे हरभरा पिकाच्याही उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
१९ हजार ८३६ हेक्टरवर रबी पिके
गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे २८ हजार ४०० हेक्टर आहे. त्यापैकी १९ हजार ८३६ हेक्टरवर रबी पिकांची लागवड झाली आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. यामध्ये ज्वारी ३२ हेक्टर, गहू २४५ हेक्टर, मका १ हजार ५९१ हेक्टर, लाखोळी ७ हजार ३११ हेक्टर, गहू १ हजार ८२४ हेक्टर, उडीद १ हजार २१९ हेक्टर, बरबटी ३६५ हेक्टर, कुळथा ६१९ हेक्टर, चवळी १८६ हेक्टर, पोपट ९६० हेक्टर, जवस १ हजार ६५७ हेक्टर, तीळ २११ हेक्टर, भूईमूग ६६५ हेक्टर व उस पिकाची ७ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. भामरागड तालुक्यात रबी पिकाचे सर्वात कमी ९८ हेक्टर क्षेत्र आहे.

Web Title: Turmeric risks due to larvae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.